Amit Shah : ….आणि वयाच्या ९०व्या वर्षी आशा भोसले यांनी अमित शाह यांच्यासमोर गायले गाणे

आशाताई यांनी 'अभी ना जाओ छोडके, के दिल अभी भरा नही...' हे गाणे गायले.

209

गायकासाठी त्याची कला हाच देव असतो. त्याची तो आयुष्यभर आराधना करतो आणि त्या कलेला प्रसन्न करतो. त्यानंतर मात्र तो कलाकार आणि त्याची कला ते दोघे एकरूप होतात. असाच अनुभव ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी दिला. वयाच्या ९०व्या वर्षीही आशा भोसले यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या आग्रहाखातर गाणे गायले, ज्यातून त्यांचा सूर आजही तरुण असल्याचे दिसले.

(हेही वाचा Sandeshkhali Violence : पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावा; राष्ट्रीय महिला आयोगाची राष्ट्रपती मुर्मू यांच्याकडे शिफारस)

अमित शाह यांची सदिच्छा भेट 

सध्या महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा तिढा सोडवण्याचे आव्हान घेऊन अमित शाह मागील दोन दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. दिवसभरातील व्यस्त नियोजनातूनही अमित शाह  (Amit Shah) यांनी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना सह्याद्री अतिथीगृहात भेट दिली. आशा भोसले यांच्या आत्मचरित्राच्या पुस्तकाचे अमित शाह यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृहात प्रकाशन झाले. त्यावेळी दिलखुलास चर्चा केल्यावर अमित शाह यांनी आशाताईंना गाणे गाण्याची विनंती केली. वयाच्या ९०व्या वर्षीही आशाताई यांनी ‘अभी ना जाओ छोडके, के दिल अभी भरा नही…’ हे गाणे गायले. आशाताई गाणे गात असताना त्यांच्याकडे अमित शाह अत्यंत आदरपूर्वक पाहत होते. त्यांचा हा व्हिडीओ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोस्ट केला. त्याला नेटकऱ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे.

आशा भोसले यांचा गाण्यांच्या रिमिक्सला विरोध 

आशाताई यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात संगीतातील सर्वच प्रकारची गाणी गायली आहेत. मात्र सध्या जुन्या गाण्यांचे रिमिक्स करून ते पाश्चिमात्य संगीतात गाण्याचा आणि संगीतात रूपांतरित करण्याचा जो प्रकार सुरु झाला आहे, त्याला आशा भोसले कायम विरोध करत असतात.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.