US Airport 5G: एअर इंडियासह अनेक फ्लाईट्स आज रद्द, काय आहे नेमकं कारण

145

आजपासून अमेरिकेत 5G सेवा सुरू होत असल्याने हजारो उड्डाणांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच एअर इंडियाच्या उड्डाणांवरही परिणाम झाला आहे. एअर इंडियाने दुबईहून अमेरिकेतील विविध विमानतळांवर येणारी उड्डाणेही रद्द केली आहेत. आजपासून अंमलात येणाऱ्या 5G टेक्नॉलॉजीमुळे फ्रिक्वेन्सीच्या मुद्द्यावर वाद निर्माण झाला होता. त्यामुळेच अमेरिकेतील 5G टेक्नॉलॉजी काही काळासाठी स्थगित करण्यात आले आहे. याचा फटका विमान सेवेवर बसला. यापार्श्वभूमीवर एअर इंडियानेही भारत आणि अमेरिकेदरम्यानच्या सेवेत बदल केल्याची माहिती मिळतेय.

नेमकं काय आहे फ्लाईट्स रद्द होण्याचं कारण

बुधवारी एअर इंडियाची विमाने अमेरिकेला जाणार नाहीत. कारण अमेरिकेत 5G मोबाईल तंत्रज्ञानाचा वापर सुरू होत आहे. एअर इंडियाने ट्विट केले आहे की त्यांची दिल्ली-न्यूयॉर्क, दिल्ली-सॅन फ्रान्सिस्को, दिल्ली-शिकागो, मुंबई-न्यू जर्सी फ्लाइट बुधवारी रद्द करण्यात आली आहेत. याशिवाय, एअरलाइनने दिल्ली ते वॉशिंग्टन फ्लाइटचे वेळापत्रक रीशेड्युल करण्याचेही सांगितले आहे. 5G नेटवर्कमुळे विमानाच्या दळणवळण व्यवस्थेत मोठी समस्या निर्माण होऊ शकते म्हणून एअर इंडियाने उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

विमान कंपन्यांचे मत काय

अनेक विमान कंपन्यांचे असेही म्हणणे आहे की विमानतळाभोवती 5G तंत्रज्ञानामुळे धोकादायक समस्या उद्भवू शकतात. हे पाहता 5G तंत्रज्ञान धावपट्टीपासून दोन मैलांच्या अंतरावर ठेवावे. काही एअरलाइन्सच्या सीईओंनी अमेरिकन परिवहन सचिवांना पत्र लिहून म्हटले आहे की, विमान वाहतूक उपकरणांमध्ये बदल न करता 5G कार्यान्वित केल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. 5G तंत्रज्ञानामुळे विमानाची उंची मोजण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.

अखेर बायडन प्रशासन झुकले

काही एअरपोर्टजवळ काही 5G सेवेचे वायरलेस टॉवर्स हे काही काळासाठी अंमलात येणार नाहीत. त्याचा परिणाम अमेरिकेत येणाऱ्या फ्लाईट्सवरही होऊ शकतो. त्यामुळेच एअरपोर्टनजीक या तंत्रज्ञानाची अंमलबजावणी न करण्याचा निर्णय घेतल्याचे जो बायडेन प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. जो बायडन यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रवासी वाहतूक, कार्गो ऑपरेशन, आर्थिक रिकव्हरी यासारख्या गोष्टींनी अडथळा येऊ नये म्हणून आम्ही 5G रोलआऊटचा निर्णय टाळत आहोत. पण उर्वरीत ९० टक्के ठिकाणी वायरलेस टॉवरची अंमलबजावणी ही नियोजित वेळापत्रकाप्रमाणेच होणार असल्याचे बायडन यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.