२५ वर्षांची प्रतीक्षा संपली; वाशीमध्ये होणार भव्य ‘महाराष्ट्र भवन’

121
२५ वर्षांची प्रतीक्षा संपली; वाशीमध्ये होणार भव्य 'महाराष्ट्र भवन'
२५ वर्षांची प्रतीक्षा संपली; वाशीमध्ये होणार भव्य 'महाराष्ट्र भवन'

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेताच गुवाहाटी पाठोपाठ अयोध्येत ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्याचा निर्णय घेतला खरा; परंतु, आपल्याच राज्यात जागा आरक्षित करूनही गेल्या २५ वर्षांपासून महाराष्ट्र भवनाचा प्रस्ताव धुळखात असल्याने टीका होऊ लागली. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी या फाईलवरची धूळ झटकत वाशीमध्ये (सेक्टर ३०) भव्य असे ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्याचे निर्देश दिले आहेत.

राज्यात शिवसेना-भाजपा युतीचे सरकार अस्तित्वात असताना, १९९८ मध्ये ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी सिडकोमार्फत वाशीमध्ये आठ हजार चौरस स्क्वेअर मीटरचा भूखंड आरक्षित करण्यात आला. खेड्यापाड्यातून मुंबई किंवा आसपासच्या ठिकाणी शिक्षण, नोकरीसाठी येणाऱ्या युवकांना आधार होईल किंवा काही अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना थांबता यावे, यासाठी वाशीमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याची योजना होती. मात्र, सरकारी अनास्थेमुळे ही फाईल २५ वर्षांपासून धूळखात पडून राहिली.

(हेही वाचा – अनिल डिग्गीकर सिडकोत, मुखर्जी एमएमआरडीएत)

तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १०० कोटी रुपये महाराष्ट्र भवन निर्मितीसाठी तरतूद केल्याचे जाहीर केले होते. परंतु, महाराष्ट्र भवन उभारायचे कुणी, यावर निर्णय झाला नसल्याने तांत्रिक पेच उद्भवला. एकनाथ शिंदे यांनी हा पेच दूर करीत सिडकोमार्फत हे भवन बांधण्यात यावे, असे आदेश दिले आहेत.

वाशीमध्ये १८ राज्यांचे भवन

नवी मुंबईतील वाशी परिसरात २००५ पासून ते २०२१ पर्यंत १६ वर्षांच्या कालावधीत तब्बल ११ राज्यांनी त्यांची कला, संस्कृती आणि परंपरेचे दर्शन घडवणाऱ्या भव्य इमारती उभ्या केल्या आहेत. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, आसाम, पंजाब, अरुणाचल, गोवा, राजस्थान, कर्नाटक, केरळ, गुजरात, ओडिशा, नागालँड, मेघालय, उत्तराखंड, मिजोरम, छत्तीसगड आणि सिक्कीम आदी राज्यांचा यामध्ये समावेश आहे. तेथील राज्यातून विविध कामांसाठी मुंबईत येणाऱ्या नागरिकांना या वास्तूंचा मोठा आधार मिळतो. त्या त्या राज्यांची सांस्कृतिक अस्मिता जपण्याचे कामदेखील या भवनांमधून होत असते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.