Police : लेखक जयेश मेस्त्री यांच्या पत्नीसोबत शेजा-याचे गैरवर्तन; पोलिसांत गुन्हा दाखल  

समीर महाकाळ आणि दीपाली महाकाळ यांच्या विरोधात या प्रकरणी तक्रार नोंदवण्यात आली आहे.

1155

लेखक जयेश मेस्त्री यांच्या पत्नीशी त्यांचे शेजारी समीर महाकाळ यांनी शिवीगाळ करुन अंगावर चालून जात मारायची धमकी देत गैरवर्तन केले. त्यांना त्यांची आई दीपाली महाकाळ यांनी या प्रकरणात साथ दिली आणि जयेश मेस्त्री यांच्या पत्नीला धक्काबुक्की केली असल्याचा प्रकार घडला. याबाबत बोरीवली पश्चिम पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

९ जून २०२३ रोजी दुपारी सुमारे १२.१५ वाजता मेस्त्री यांचे शेजारी समीर महाकाळ यांच्या आई दीपाली महाकाळ यांनी विनाकारण वाद घातला. त्यानंतर समीर महाकाळ घटनास्थळी आले व त्यांनी मेस्त्री यांच्या पत्नीशी व जयेश मेस्त्री यांच्याशी गैरवर्तन केले. त्यांच्या पत्नीला टिचक्या वाजवून “तू आत जायचंय. चल निघ चल” व तिच्या छातीजवळ जाऊन अश्लील शिवीगाळ करत हात उगारुन ‘मारीन तुला, चल निघ’ म्हणत मारायची धमकी दिली. तसेच त्यांची आई दीपाली महाकाळ यांनी मेस्त्री यांच्या पत्नीला धक्काबुक्की केली. समीर महाकाळ यांनी मेस्त्री कुटुंबाला मारायची व घर सोडून जायची धमकी दिली आहे. आता समीर महाकाळ आणि दीपाली महाकाळ यांच्या विरोधात या प्रकरणी तक्रार नोंदवण्यात आली आहे, अशी माहिती जयेश मेस्त्री यांनी दिली.

अशीच घटना याआधीही १३ एप्रिल २०२३ रोजी रात्री ११.३० दरम्यान घडली होती. त्यावेळीही अतिशय सामान्य कारणावरुन समीर महाकाळ दारुच्या नशेत जयेश मेस्त्री यांच्या पत्नीच्या अंगावर चालून आले होते. अरेरावीची भाषा केली. तसेच त्यांची पत्नी समृद्धी महाकाळ आणि आई दीपाली महाकाळ यांनी देखील मेस्त्री यांच्या पत्नीशी भांडण केले. समीर महाकाळ दारुच्या नशेत मेस्त्री यांच्या पत्नीशी दुर्व्यवहार करत असताना त्यांच्या घरातल्या स्त्रियांनी ही घटना थांबवण्याऐवजी महाकाळ यांच्या गुन्ह्यात त्यांची साथ दिली आणि मेस्त्रींच्या पत्नीशी वाद घातला. मेस्त्री हे भाडेकरु असल्यामुळे त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे.

(हेही वाचा Pandharpur Wari : आळंदीमध्ये मंदिरात पोलिसांसोबत झटापट करणारे तरुण खरंच वारकरी होते का?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.