मुंबई (सचिन धानजी)
महापलिका प्रशासनाने (BMC) उत्पन्न वाढीच्या दृष्टीकोनातून छत्रपती शिवाजी महाराज मंडईच्या (Chhatrapati Shivaji Maharaj Mandai) जागेसह वरळीतील अस्फाल्ट प्लांटच्या जागा लिलाव पध्दतीने भाडे तत्वावर देण्यासाठी मागवलेल्या स्वारस्य अर्जांना आता चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. या भूखंडांची किंमत कमी केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज मंडईच्या जागेसाठी निश्चित केलेल्या दरापेक्षा कमी बोली लागली आहे, तर वरळी अस्फाल्टच्या जागेसाठी अधिक बोली लागल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे किंमत कमी करूनही मोक्याच्या जागेवर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मंडईच्या जागेसाठी कमी बोली लागल्याने महापालिकेलाही विचार करायला भाग पाडले गेले आहे. (BMC)
(हेही वाचा – राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनी शरद पवार गटाला मोठा धक्का; सांगली-साताऱ्यातील दोन नेते BJP च्या गोटात)
मुंबई महापालिका प्रशासनाने आता उत्पन्न वाढीचा विचार करत काही विनावापर असलेल्या आणि भविष्यात ज्या जागांची महापालिकेला गरज नाही असे भूखंड भाडेकरार पट्ट्यावर देऊन त्यातून महसूल वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी तीन भूखंड लिलाव (bmc plot lease) पध्दतीने भाडेकरारावर देण्यासाठी स्वारस्य अभिरुची अर्ज मागवण्यात आले होते. त्यानंतर मलबारहिलमधील जागा बेस्टकडे कायम राखण्याचा निर्णय घेण्यात आल्याने केवळ वरळी अस्फाल्ट आणि छत्रपती शिवाजी महाराज मंडईच्या जागेचा लिलाव करण्यासाठी पुन्हा जाहिरात प्रकाशित केली.
महापालिकेने एकमेव वरळी अस्फाल्ट (Worli Asphalt) येथील १० हजार८४७ चौरस मीटरची जागा जागा लिलाव पध्दतीने भाडेकरारावर देण्यासाठी फेब्रुवारीमध्ये काढलेल्या जाहिरातीमध्ये २०६९ एवढी रक्कम निश्चित केली होती. परंतु याला प्रतिसाद न लाभत असल्याने आता या भूखंडाचा दर सुमारे ७५५ कोटी रुपये एवढा केला होता. या जागेसाठी तीन अर्ज प्राप्त झाले असून यासाठी सर्वांधिक बोली ही ७८३ कोटी रुपयांची लागल्याची माहिती समोर आहे.
(हेही वाचा – ‘पाकिस्तानात दहशतवादी जितके आत असतील तितके आत घुसू’; परराष्ट्रमंत्री S Jaishankar यांचा स्पष्ट इशारा)
तर छत्रपती शिवाजी महाराज मंडईच्या सीएस क्रमांक १५०० या जागेचे एकूण क्षेत्रफळ ८,११६ चौरस मीटर आहे, याची लिलावाची अंदाजित रक्कम २, १७५ कोटी रुपये एवढी निश्चित केली होती, परंतु याला प्रतिसाद न लाभल्याने याची किंमत आता सुमारे ४३० कोटी रुपये एवढी निश्चित करून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. यासाठी दोन अभिरुची अर्ज प्राप्त झाले असून यामध्ये तब्बल ६१ कोटी रुपयांची कमीची बोली लागली आहे. या जागेसाठी सर्वांधिक बोली ३६९ कोटी रुपयांची लागल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आयुक्त आता काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.
भाडेकरारावर कोणत्या जागांचा होणार लिलाव
वरळी अस्फाल्ट प्लांट, सीएस क्रमांक १६२९ (अंशत 🙂
जागेचे क्षेत्रफळ : १०,८४७ चौरस मीटर
अपेक्षित पूर्वीचे उत्पन्न : २,०६९ कोटी रुपये
अपेक्षित सुधारीत उत्पन्न : सुमारे ७५५ काटी रुपये
सर्वाधिक बोली : ७८३ कोटी रुपये
(हेही वाचा – भाडेवाढ न करता एसी ट्रेन वाढविण्याचा विचार; CM Devendra Fadnavis यांचे विधान)
महापालिका ए वॉर्ड, छत्रपती शिवाजी महाराज मंडई, सीएस क्रमांक १५००
जागेचे क्षेत्रफळ : ८,११६ चौरस मीटर
अपेक्षित पूर्वीचे उत्पन्न : २,१७५ कोटी रुपये
अपेक्षित सुधारीत उत्पन्न : सुमारे ४३० कोटी रुपये
सर्वांधिक बोली : ३६९ कोटी रुपये
हेही पहा –
Join Our WhatsApp Community