-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
हिवताप निर्मुलनासाठी मुंबईत अधिक रुग्णसंख्या असणाऱ्या प्रशासकीय विभागाच्या ठिकाणी ‘फोकाय बेस्ड १-३-७ स्ट्रॅटेजी’ चा अवलंब करण्यात आला आहे, या पद्धतीनुसार पहिल्या दिवशी मलेरिया तापाचे रुग्ण शोधणे, तिसऱ्या दिवसापर्यंत सहवासितांची सर्वेक्षण करणे, सातव्या दिवसात रुग्ण सापडलेल्या भागात सर्वेक्षण करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे असे आहे. विभागनिहाय कृती आराखडा तयार करून डासांची उत्पत्ती स्थाने नष्ट करणे ते रुग्णांची शोध मोहीम राबविणे, निदान आणि समूळ उपचार करून रुग्ण बरा करण्यासाठी भर देण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. (World Malaria Day 2025)
मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली डास निर्मूलन समितीची आढावा बैठक मुंबई महानगरपालिका मुख्यालयात नुकतीच पार पडली. अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, विशेष कार्य अधिकारी (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चोरे, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा, कीटकनाशक अधिकारी चेतन चौबळ यांच्यासह मुंबईतील विविध शासकीय, निम-शासकीय संस्था आणि प्राधिकरणांचे प्रतिनिधी या बैठकीसाठी उपस्थित होते. केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग, म्हाडा, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई पोर्ट ट्रस्ट, नौदल, वायूदल, अभियांत्रिकी सेवा, बेस्ट, डाक विभाग, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि., भाभा अणुसंशोधन केंद्र, दुग्ध विभाग अशा शासकीय, निम-शासकीय यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी, प्रतिनिधी या बैठकीत सहभागी झाले होते. (World Malaria Day 2025)
मुंबईत पावसाळी आजार प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने विविध यंत्रणांच्या सक्रिय सहभागाने डास प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. डास प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात स्थळ भेटी देण्यात आल्या आहेत. तसेच अतिजोखमीच्या ठिकाणी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या पावसाळी आजार प्रतिबंधात्मक उपाययोजनांना सर्व यंत्रणांनी सहकार्य करण्यासोबतच सक्रियपणे सहभाग घेणे गरजेचे आहे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी केले. (World Malaria Day 2025)
मुंबई महानगरपालिकेचा कीटकनाशक विभाग आणि विविध यंत्रणांच्या सहकार्याने मे महिन्यातील दुसऱ्या आठवड्यामध्ये संयुक्त पाहणी दौरा आयोजित करावा, तसेच डास उत्पत्ती स्थानांच्या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या अनुषंगाने विविध यंत्रणांनी उत्तम समन्वय आणि संवादासाठी व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करावा असे निर्देश गगराणी यांनी दिले. (World Malaria Day 2025)
(हेही वाचा – Congress नेते रत्नाकर मतकरींकडून मृतांचा अपमान; म्हणाले, Pahalgam हल्ल्यात मृत झालेल्या २६ पैकी १४ मुस्लिम!)
जागतिक मलेरिया दिन २०२५
मुंबईत पावसाळी आजार प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विभागीय पातळीवर अधिकाधिक प्रयत्न सुरु आहेत. याअनुषंगाने प्रशासकीय विभागनिहाय आराखडा तयार करण्यात आला आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी विभागनिहाय शीघ्र प्रतिसाद कृती पथक नेमण्यात येणार आहे. प्रशासकीय विभागातील सहायक आयुक्त, वैद्यकीय अधिकारी, कीटक नियंत्रण अधिकाऱ्यांच्या समन्वयातून ही प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात येणार आहे. (World Malaria Day 2025)
ड्रोनचा वापर
डास उत्पत्ती स्थानांच्या शोध मोहिमेमध्ये अतिजोखमीच्या व धोकादायक स्थळे पाहणीसाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्याची सुरूवात कीटकनाशक विभागामार्फत करण्यात आली आहे. (World Malaria Day 2025)
(हेही वाचा – Cyber Crime : सायबर गुन्हेगारांना बँक खाते पुरवणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश)
वर्षनिहाय कार्यवाही व रुग्णसंख्या
वर्ष २०२२ मध्ये तापाच्या रुग्णांचे सर्वेक्षण करून हिवतापासाठी (रुग्ण व सहवासितांचे) १३.६ लक्ष रक्त नमुने (स्लाईड्स) संकलित करण्यात आले होते. वर्ष २०२२ मध्ये ३ हजार ९८५ रूग्णसंख्या निदर्शनास आली. तर वर्ष २०२३ मध्ये हिवतापासाठी (रुग्ण व सहवासितांचे) १३ लक्ष ९८ हजार रक्त नमुने संकलित करण्यात आले होते. वर्ष २०२३ मध्ये ७ हजार ३१९ रूग्णसंख्या निदर्शनास आली. तर वर्ष २०२४ मध्ये तापाच्या रुग्णांचे सर्वेक्षण करून हिवतापाचे (रुग्ण व सहवासितांचे) १५.१ लक्ष रक्त नमुने (स्लाईड्स) संकलित करण्यात आले होते. वर्ष २०२४ मध्ये ७ हजार ९३९ रुग्णसंख्या आढळून आली. मागील दोन वर्षात व्यापक सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आल्याने तसेच खासगी रुग्णालये व प्रयोगशाळांमार्फत प्राप्त रुग्ण संख्येचा समावेश केल्याने रुग्णवाढ दिसून येते. (World Malaria Day 2025)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community