-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून, प्लास्टिक प्रदूषण टाळण्याचा संदेश देणारी ‘टिक टिक प्लास्टिक’ ही पर्यावरण जनजागृती मोहीम मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने व भामला फाउंडेशन, संयुक्त राष्ट्रसंघाचा पर्यावरण कार्यक्रम, वूई लव्ह इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचा संदेश देणाऱ्या लघूचित्रफिती तसेच भित्तिपत्रके यांचे अनावरण शुक्रवारी करण्यात आले. (World Environment Day)
(हेही वाचा – World No Tobacco Day : तंबाखू सेवनामुळे वर्षाला १३ लाख लोकांचा मृत्यू)
राज्याचे माहिती व तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, मोहिमेचे सदिच्छादूत तथा अभिनेते अजय देवगण, चित्रपट निर्माते रोहित शेट्टी, चित्रपट निर्माते इम्तियाज अली, अभिनेत्री शर्वरी वाघ, भामला फाउंडेशनचे अध्यक्ष आसिफ भामला, नृत्य दिग्दर्शक शामक दावर, महानगरपालिकेचे उपायुक्त (परिमंडळ ३) विश्वास मोटे, एच पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त दिनेश पल्लेवाड, हंगामा डिजीटल मीडिया एंटरटेनमेंटचे व्यवस्थापकीय संचालक नीरज रॉय विविध मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती. मुंबई महानगरपालिकेच्या खार (पश्चिम) येथील एच पश्चिम विभाग कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधून जनजागृती मोहिमेची माहिती मुंबई देण्यात आली. (World Environment Day)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community