World Earth Day: जागतिक पृथ्वी दिन साजरा करण्यामागचं ‘हे’ आहे खरं कारण!

36
World Earth Day : जगभरातील देश दरवर्षी २२ एप्रिल रोजी जागतिक पृथ्वी दिन साजरा करण्याची पद्धत आहे. पृथ्वी आणि तिच्या पर्यावरणाचे रक्षण करण्याबाबत लोकांना जागरूक करण्यासाठी पृथ्वी दिन साजरा केला जातो. भारतासह सुमारे १९५ देश पृथ्वी दिन साजरा करतात. (World Earth Day)

या दिनानिमित्त लोकांना पर्यावरण सुरक्षित ठेवून पृथ्वीची काळजी कशी घ्यावी याबद्दल समजावून सांगितले जाते. तसेच, प्रत्येकाने पृथ्वी हिरवीगार ठेवण्यासाठी योगदान देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नैसर्गिक संसाधनांचे (Natural Resources) संवर्धन करणे, पर्यावरणाचे रक्षण करणे आणि पर्यावरण संरक्षणातील आव्हानांशी लढणे किंवा त्यावर उपाय शोधणे यासाठी हा दिवस खास आहे.

(हेही वाचा – समय रैनाच्या अडचणी पुन्हा वाढल्या; अपंगत्वावर केलेल्या टिप्पणीमुळे Supreme Court संतापले; म्हणाले…)

२२ एप्रिल १९७० रोजी पहिल्यांदा पृथ्वी दिन साजरा (Celebrating Earth Day) करण्यात आला. पृथ्वी दिन साजरा करण्यास सुरुवात करण्याचे श्रेय अमेरिकन राजकारणी आणि पर्यावरण कार्यकर्ते सिनेटर गेराल्ड नेल्सन यांना जाते. पुढे डेनिस हेस देखील या मोहिमेत जेलार्डसोबत सामील झाले. १९९० मध्ये पृथ्वी दिनी, १४१ राष्ट्रांमधील २० कोटी लोकांनी हा दिवस साजरा केला आणि १९९२ मध्ये ब्राझीलमध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण आणि विकास परिषदेचा पाया घातला. त्यानंतर, दरवर्षी कोट्यवधी लोक पृथ्वी दिन साजरा करतात.

नैसर्गिक आपत्ती (Natural Disaster) टाळण्याचे मार्ग, लोकसंख्या वाढ नियंत्रित करणे, जंगलतोड आणि प्रदूषण रोखण्याचे मार्ग, लोकसंख्या वाढीवर लक्ष ठेवणे इत्यादी गोष्टींबद्दल लोकांना अवगत केले जाते. पृथ्वीशिवाय मानवी जीवन अशक्य आहे. पृथ्वीचं रक्षण करण्यासाठी आपल्याला झाडे लावण्याची प्रतिज्ञा करावी लागेल. असे केल्याने आपल्याला हिरवळ मिळेल आणि ऑक्सिजनही मिळेल.

(हेही वाचा – Maharashtra Lottery : केरळ राज्य लॉटरीच्या अभ्यासासाठी समिती)

तसेच पुनर्वापराच्या अभावामुळे, सर्वत्र कचऱ्याचे ढीग आहेत, ज्यामुळे वायू प्रदूषण आणि जल प्रदूषण (Water Pollution) होते. म्हणून आपल्याला कचरा व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. या वर्षीच्या जागतिक पृथ्वी दिनाची (Earth Day) थीम आहे – ‘आपली शक्ती, आपली पृथ्वी’. ही थीम साजरी करण्याचा उद्देश देशांच्या लोकांना, संघटनांना आणि सरकारांना कमी होत चाललेल्या ऊर्जा स्रोतांना अक्षय स्रोतांमध्ये रूपांतरित करण्यासाठी आणि शाश्वत भविष्याचा पाया रचण्यासाठी प्रेरित करणे असा आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.