पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकाच्या पत्नीची Operation Sindoor वर प्रतिक्रिया; आमच्यावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा…

भारतीय सशस्त्र दलांनी बुधवारी पहाटे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले,

174
पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने भूदल आणि वायू दलाच्या माध्यमांनी संयुक्तपणे ऑपरेशन सिंदूरच्या (Operation Sindoor) माध्यमातून पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करून पाकिस्तानातील दहशतवाद्यांची ९ ठिकाणे उद्ध्वस्त केली. यानंतर पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या नातलगांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. त्यापैकी मध्य प्रदेशातील इंदूर येथील सुशील नथानिएल यांच्या पत्नी जेनिफर म्हणाल्या की, जे काही घडले ते बरोबर आहे, पण पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचाही खात्मा केला पाहिजे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील बळी सुशील नथानिएलच्या पत्नीनेही भारतीय सैन्याच्या ‘ऑपरेशन सिंदूर’वर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले की, त्यांच्या पतीची हत्या करणाऱ्या चार दहशतवाद्यांनाही मारले पाहिजे अशी त्यांची इच्छा आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, भारतीय सशस्त्र दलांनी बुधवारी पहाटे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले (Operation Sindoor) केले, ज्यात बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मदचा बालेकिल्ला आणि मुरीदके येथील लष्कर-ए-तैयबाचा अड्डा यांचा समावेश आहे. यानंतर, मध्य प्रदेशातील इंदूर येथील सुशील नथानिएल यांच्या पत्नी जेनिफर (५४) म्हणाल्या, ‘जे काही घडले ते बरोबर आहे, पण त्या चार लोकांना (पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेले दहशतवादी) देखील मारले पाहिजे.
भाभी पुन्हा पुन्हा बेशुद्ध पडत आहे, मुले गप्प आहेत, पहलगाममध्ये मारल्या गेलेल्या सुशीलचा भाऊ रडू लागला. आम्हाला कलमा म्हणायला लावणाऱ्यांचा खात्मा करावा, असेही य हल्ल्यातील पीडित सुशील नथानिएलच्या पत्नीने ऑपरेशन सिंदूरवर भाष्य केले. इंदूर येथील रहिवासी सुशील नथानिएल शहरापासून सुमारे २०० किमी अंतरावर असलेल्या अलिराजपूर येथे भारतीय जीवन विमा महामंडळ (एलआयसी) मध्ये व्यवस्थापक म्हणून काम करत होते. (Operation Sindoor)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.