BMC : महापालिकेला लिलावातील ‘त्या’ दोन भूखंडांची किंमत का करावी लागली कमी? काय आहे कारण

584
नागरिकांचा सहभाग वाढवून सेवांमध्ये सुलभता आणण्यासाठी BMC करणार एआय तंत्रज्ञानाचा वापर
  • सचिन धानजी, मुंबई

महापालिका प्रशासनाने उत्पन्न वाढीच्या दृष्टीकोनातून विचार करत वापरात नसलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मंडईच्या जागेसह वरळीतील अस्फाल्ट प्लांटच्या जागा लिलाव पद्धतीने भाडे तत्वावर देण्यासाठी दुसऱ्यांदा जाहिरात प्रदर्शित केली आहे. पहिल्या वेळेला केलेल्या प्रयत्नांना यश न आल्याने आता महापालिकेने दोन्ही ठिकाणच्या प्रस्तावित लिलावाची किंमतच चक्क २५ टक्क्यांवर आणून ठेवली आहे. त्यामुळे भूखंडाची किंमतच २५ ते ४० टक्के कमी केल्यानंतर तरी या भूखंडासाठी कुणी संस्था पुढे येणार का असा सवाल उपस्थित आहे. (BMC)

मुंबई महापालिका प्रशासनाने आता उत्पन्न वाढीचा विचार करत काही विनावापर असलेल्या आणि भविष्यात ज्या जागांची महापालिकेला गरज नाही असे भूखंड भाडेकरार पट्ट्यावर देऊन त्यातून महसूल वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी तीन भूखंड लिलाव पद्धतीने भाडेकरारावर देण्यासाठी स्वारस्य अभिरुची अर्ज मागवण्यात आले होते. मलबार हिलमधील जागा बेस्टकडे कायम राखण्यासाठी तसेच शिवाजी मंडईच्या जागेसाठी मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्याने ही प्रक्रिया मागे घेतली होती. त्यानंतर वरळी अस्फाल्ट आणि छत्रपती शिवाजी महाराज मंडईच्या जागेचा लिलाव करण्यासाठी जाहिरात प्रकाशित केल्यानंतरही त्याला प्रतिसाद न लाभल्याने या दोन्ही भूखंडाच्या लिलावासाठी निश्चित केलेली रक्कम कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मागील ९ एप्रिल २०२५ रोजी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून येत्या २८ एप्रिलपर्यंत विविध संस्था आणि व्यक्तीकडून स्वारस्य अर्ज मागवण्यात आले आहे. (BMC)

(हेही वाचा – Award : राज्य शासनाचे सांस्कृतिक पुरस्कार जाहीर)

महापालिकेने एकमेव वरळी अस्फाल्ट येथील १० हजार ८४७ चौरस मीटरची जागा जागा लिलाव पद्धतीने भाडेकरारावर देण्यासाठी फेब्रुवारीमध्ये काढलेल्या जाहिरातीमध्ये २०६९ एवढी रक्कम निश्चित केली होती. परंतु याला प्रतिसाद न लाभत असल्याने आता या भूखंडाचा दर सुमारे ७५५ कोटी रुपये एवढा केला आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज मंडईच्या सीएस क्रमांक १५०० या जागेचे एकूण क्षेत्रफळ ८,११६ चौरस मीटर आहे, याची लिलावाची अंदाजित रक्कम २, १७५ कोटी रुपये एवढी निश्चित केली होती. परंतु याला प्रतिसाद न लाभल्याने याची किंमत आता सुमारे ४३० कोटी रुपये एवढी निश्चित करून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, भूखंडाच्या लिलावाची बोली रक्कम पूर्वी ही अधिक एफएसआयच्या लाभाच्या तुलनेत होती, परंतु आता ही रक्कम कमी करताना या जागांचा एफएसआय १.३३ एवढाच असेल. जर लिलावात भाग घेणाऱ्या संस्थेला अथवा व्यक्तीला जर त्यावर अतिरिक्त एफएसआयचा लाभ घ्यायचा असेल तर महापालिकेने पूर्वी निश्चित केलेली रक्कमच त्यांना द्यावी लागणार आहे. त्यामुळे जर १.३३ एफएसआयमध्ये जर त्यांना बांधकाम करायचे असल्यास सध्या लावण्यात येणाऱ्या बोलीच्या रकमेत करता येईल, त्यात कुठली अडचण नसेल. परंतु आता भूखंडाची बोली किंमत कमी केल्यास महापालिकेला प्रतिसाद लाभेल असाही विश्वास व्यक्त केला जात आहे. (BMC)

(हेही वाचा – Murshidabad Violence नंतर मानवाधिकारवाल्यांच्या वॉलवर शुकशुकाट)

भाडेकरारावर कोणत्या जागांचा होणार लिलाव? 

वरळी अस्फाल्ट प्लांट, सीएस क्रमांक १६२९ (अंशत 🙂

जागेचे क्षेत्रफळ : १०,८४७ चौरस मीटर

अपेक्षित पूर्वीचे उत्पन्न : २,०६९ कोटी रुपये

अपेक्षित सुधारीत उत्पन्न : सुमारे ७५५ काटी रुपये

महापालिका ए वॉर्ड, छत्रपती शिवाजी महाराज मंडई, सीएस क्रमांक १५००

जागेचे क्षेत्रफळ : ८,११६ चौरस मीटर

अपेक्षित पूर्वीचे उत्पन्न : २,१७५ कोटी रुपये

अपेक्षित सुधारीत उत्पन्न : सुमारे ४३० कोटी रुपये

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.