मुंबईतील ४०० किलोमीटरच्या रस्त्यांवर खड्डे पडल्यास बुजवणार कोण? रस्ते कंत्राटदार की खड्ड्यांचे कंत्राटदार

166
मुंबईतील ४०० किलोमीटरच्या रस्त्यांवर खड्डे पडल्यास बुजवणार कोण? रस्ते कंत्राटदार की खड्ड्यांचे कंत्राटदार
मुंबईतील ४०० किलोमीटरच्या रस्त्यांवर खड्डे पडल्यास बुजवणार कोण? रस्ते कंत्राटदार की खड्ड्यांचे कंत्राटदार

मुंबई शहर आणि उपनगरांमधील एकूण ९१० रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण आणि ८६ सिमेंट काँक्रिट रस्त्यांचे खराब झालेल्या भागांची डागडुजी करण्यासाठी तब्बल सहा हजार कोटींचे कंत्राट पाच भागांमध्ये विभागून दिले आहे. परंतु या निविदेतील पात्र कंत्राटदारांच्या माध्यमातून केवळ दोन चार रस्त्यांच्याच कामाला सुरुवात झालेली असून आगामी पावसाळ्यात नव्याने विकास करण्यात येणाऱ्या या खराब रस्त्यांवर खड्डे पडल्यास ते बुजवण्याची जबाबदारी संबंधित नियुक्त कंत्राटदारांची असली तरी प्रत्यक्षात या कंत्राटदारांनी हात वर केल्याने प्रशासनाला आता या रस्त्यांवरील खड्ड्यांची मलमपट्टी करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यावी लागली आहे. प्रशासनाला या रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी स्वतंत्र एजन्सीची नियुक्ती करावी लागली आहे. त्यामुळे हे खड्डे भरण्याचा खर्च संबंधित कंपनींकडून वसूल केला जाणार असला तरी प्रत्यक्षात हे खड्डे बुजवण्याची कार्यवाही महापालिकेलाच करावी लागणार आहे, असे बोलले जात आहे.

मुंबई महापालिकेच्यावतीने सुमारे ४०० किलोमीटर लांबीच्या रस्ते काँक्रिटीकरण कामांसाठी शहर आणि पूर्व उपनगरांसाठी प्रत्येक एक आणि पश्चिम उपनगरांसाठी तीन अशाप्रकारे पाच कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे. महानगरपालिकेकडून हाती घेण्यात येणाऱ्या सुमारे ४०० किलोमीटर लांबीच्या रस्ते काँक्रिटीकरणामध्ये पश्चिम उपनगरांमधील ५१६ रस्ते, शहरांमधील २१२ रस्ते आणि ८५ तुटलेले सिमेंट काँक्रिट रस्त्यांचे भाग तसेच पूर्व उपनगरांमधील १८२ रस्त्यांचा समावेश आहे. या पाचही कामांसाठी स्वतंत्र कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे. या सर्व ३९७ किलोमीटरच्या रस्त्यांसाठी विविध करांसह सुमारे ८३१९ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.

(हेही वाचा – महापालिकेतील ११३ समुदाय संघटकांच्या पदांची भरती लटकलेलीच!)

शहर भागांच्या रस्ते सिमेंटीकरणाच्या कामांसाठी रोड वे सोल्युशन इंडिया इन्फ्रा लिमिटेड, पूर्व उपनगरांमधील रस्ते सिमेंटीकरणाच्या कामांसाठी ईगल इन्फ्रा इंडिया लिमिटेड, तर पश्चिम उपनगरांमधील रस्ते कामांसाठी दिनेशचंद्र आर अग्रवाल इन्फ्राकॉन, मेघा इंजिनिअरिंग ऍण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, एनसीसी लिमिटेड या कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. परंतु यापैकी नेमक्याच काही रस्त्यांच्या कामाला सुरुवात झाली आहे. परंतु ज्या रस्त्यांची कामे निश्चित करण्यात आलेली आहे, त्या रस्त्यांवर खड्डे पडल्यास ते बुजवण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदार कंपनींची आहे. परंतु ही कामे सुरु न झालेल्या रस्त्यांवर खड्डे पडल्यास ते बुजवण्यास संबंधित कंत्राटदारांनी असमर्थता दर्शवल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी स्वतंत्र एजन्सीची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कंत्राटदारांना नेमलेल्या रस्त्यांवर खड्डे पडल्यास ते महापालिकेच्यावतीने भरले जाणार आहेत. परंतु यासाठी येणारा खर्च कंत्राटदारांच्या देयकांमधून वसूल केला जाणार आहे. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून महापालिका प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यात उद्भवणाऱ्या रस्त्यांवरील खराब भागांची सुधारणा करण्यासाठी नेमलेल्या संस्थांकडून या खड्डयांची डागडुजी करून घेतली जाणार आहे. त्यामुळे बुजवलेले खड्डे विकास करण्यात येणाऱ्या रस्त्यावरील असतील आणि त्यासाठी कंत्राटदार नियुक्त असेल तर संबंधित कंत्राटदारांकडून याचा खर्च वसूल केला जाईल, असे प्रशासनातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.