Virar : पत्ते खेळत असतांना पोलीस आले म्हणून पळाला अन् मृत्यूने गाठले

69
Virar : पत्ते खेळत असतांना पोलीस आले म्हणून पळाला अन् मृत्यूने गाठले
Virar : पत्ते खेळत असतांना पोलीस आले म्हणून पळाला अन् मृत्यूने गाठले

विरारमध्ये पत्त्यांचा डाव सुरु असतांना पोलीस आले; म्हणून युवकाने पळ काढला; मात्र त्याला वाटेत हृदयविकाराच्या धक्क्याने गाठले. (Virar) विरारमध्ये पत्त्यांचा डाव सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर ही धाड टाकण्यात आली. यावेळी पळून जाताना 19 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. विरारच्या आगाशी गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. प्रचीत भोईर असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे आगाशी गावावर शोककळा पसरली आहे. तसेच येथील गणेशोत्सवावर दु:खाचे सावट पसरले आहे. याप्रकरणी अर्नाळा पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.

(हेही वाचा – UN News : प्रभावशाली देश परिवर्तनाला विरोध करत आहेत; जयशंकर यांची स्पष्टोक्ती)

२४ सप्टेंबरच्या पहाटे तीनच्या सुमारास अर्नाळा पोलिसांचे गस्तीवरील वाहन छापा टाकण्यासाठी आले. पोलिसांना पाहून मुलांची पळापळ सुरू झाली. पळत असताना प्रचित विनोद भोईर हा मुलगा खाली कोसळला. त्याला उपचारासाठी विरारच्या संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. (Virar)

या प्रकारामुळे गावात एकच तणाव निर्माण झाला होता. खबरदारी म्हणून पोलिसांनी संजीवनी रुग्णालयात बंदोबस्त ठेवला होता. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप मृत मुलाच्या नातेवाईकांनी केला आहे. ‘पोलिसांनी छापा टाकण्याची गरज नव्हती. पोलिसांनी त्याचवेळी त्याला प्रथमोपचार दिले असते, तर जीव वाचला असता’, असे आरोप मयत प्रचीतच्या नातेवाईकांनी केले आहेत. (Virar)

पोलिसांचे स्पष्टीकरण

‘तरुणाला कोणत्याही प्रकारची मारहाण झालेली नाही. केवळ धावताना हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला आहे’, असे सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मोकाशी यांनी सांगितले. तर ‘आम्ही मंडपावर छापा घातला नाही. केवळ रात्रीच्या पोलीसांचे गस्तीचे वाहन तेथून जात होते. पोलीस छापा टाकायला आले आणि ‘ते आपल्याला पकडतील’, या भीतीने मुले पळाली आणि त्यात या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे’, असे अर्नाळ्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव कर्पे यांनी सांगितले. (Virar)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.