महाराष्ट्र शासनाचे ‘Aaple Sarkar’ पोर्टल सुट्टीवर नेमकं कारण काय ? जाणून घ्या

283
प्रतिनिधी 
Aaple Sarkar : महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ www.maharashtra.gov.in आणि शासन निर्णय संकेतस्थळ www.gr.maharashtra.gov.in येत्या 15 आणि 16 मे 2025 रोजी तांत्रिक अद्ययावतीकरण आणि नियमित देखभालीसाठी बंद राहणार आहे. या दोन दिवसांच्या कालावधीत कोणत्याही प्रकारच्या ऑनलाइन सेवा उपलब्ध नसतील, अशी माहिती महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाने (MahaIT) प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. (Aaple Sarkar)

(हेही वाचा – J. J. Hospital : जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाला गती!)

माहिती तंत्रज्ञान महामंडळाने स्पष्ट केले की, ही पोर्टल्स नियमितपणे तांत्रिकदृष्ट्या अद्ययावत करणे आवश्यक आहे, जेणेकरून नागरिकांना आणि शासकीय यंत्रणांना अधिक कार्यक्षम आणि सुरक्षित सेवा मिळू शकतील. या देखभाल कार्यामुळे पोर्टलवरील माहिती आणि सेवांचा दर्जा सुधारेल, अशी अपेक्षा आहे.

महामंडळाने सर्वसामान्य नागरिक, शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या कालावधीत संकेतस्थळावरील सेवा बंद राहणार असल्याची नोंद घेण्याचे आवाहन केले आहे. “15 आणि 16 मे रोजी कोणतीही ऑनलाइन सेवा उपलब्ध नसेल, त्यामुळे नागरिकांनी त्यांच्या गरजेनुसार आधीच आवश्यक माहिती किंवा कागदपत्रे डाउनलोड करून ठेवावी,” असे महामंडळाने सुचवले आहे.

(हेही वाचा – Sanatan Sanstha : गोमंतकात प्रथमच भरणार हजारो भक्तांचा कुंभमेळा !)

पुढील घडामोडींकडे लक्ष

दोन दिवसांच्या देखभालीनंतर 17 मे 2025 पासून ही पोर्टल्स पुन्हा कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. अद्ययावतीकरणामुळे संकेतस्थळाची कार्यक्षमता आणि वापरकर्ता अनुभव सुधारेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी या कालावधीत वैकल्पिक मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.