विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीने लाडक्या बहिणींना (Ladki Bahin Yojana) २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याच्या संदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते तथा मंत्री नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांनी या संदर्भात विधान केले आहे. लाडक्या बहिणींना (Ladki Bahin Yojana) २१०० रुपये देऊ, असे कोणीही म्हटलेच नाही. लाडक्या बहिणी या १५०० रुपयांमध्ये खूश आहेत, असे झिरवळ यांनी म्हटले आहे.
(हेही वाचा – Pakistani Citizen : राजधानी दिल्लीत ५ हजार पाकिस्तानी; गुप्तचर यंत्रणेने सोपवली यादी)
मंत्री नरहरी झिरवळ काय म्हणाले?
लाडक्या बहिणी नाराज आहेत; कारण त्यांना २१०० ऐवजी १५०० रुपयेच मिळत आहेत. तेही नियमित मिळत नाहीत, असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी पत्रकार परिषदेत मंत्री नरहरी झिरवळ यांना विचारला. “लाडक्या बहिणी नाराज आहेत, हे आपण सांगत असता किंवा विरोधक सांगत असतात. सर्व बाजूंनी लाडक्या बहिणी खूश आहेत. लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचे कोणीही जाहीर केलेले नाही”, असे मंत्री नरहरी झिरवळ यांनी म्हटले आहे.
लाडक्या बहिणी १५०० रुपयांमध्ये खुश
विरोधकांनी आधी म्हटले की, महायुती लाडक्या बहिणींना १५०० रुपये देणार नाही; कारण त्यांच्याकडे १५०० रुपये देण्याची ऐपत नाही, अशी टीका केली होती. त्यानंतर त्यांनी म्हटले की, २१०० रुपये देणार आणि मग १५०० रुपये दिले नाहीत, तर २१०० कसे देणार ?, अशी टीका केली. राज्य सरकारने लाडक्या बहिणींना १५०० रुपये दिले, तर आता २१०० रुपये देण्यावर विरोधक जोर देत आहेत. मात्र, असा काही प्रकार नाही. लाडक्या बहिणींना १५०० रुपये देखील परिपूर्ण आहेत. लाडक्या बहिणी १५०० रुपयांमध्ये खूश आहेत, असे मंत्री नरहरी झिरवळ यांनी म्हटले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community