राजधानी दिल्लीसह उत्तरेकडील अनेक राज्यांत वादळी वाऱ्यासह (Weather Update ) अवकाळी पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. अंगावर वीज, झाड तसेच घर कोसळून दिल्ली व उत्तर प्रदेशात प्रत्येकी ४ तर छत्तीसगडमध्ये दोघांचा मृत्यू झाला. खराब हवामानामुळे इंदिरा गांधी विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या २०० हून अधिक विमानांना उशीर झाला तर दोन फ्लाइट जयपूर तर एक अहमदाबादमध्ये उतरवण्यात आली. (Weather Update )
हेही वाचा-भारताची निर्यात पोहोचली विक्रमी 824.9 अब्ज डॉलर्सवर; Reserve Bank of India चा अहवाल
पंजाब, हरयाणा, राजस्थान, पश्चिम बंगाल व जम्मू-काश्मीरमध्येदेखील अवकाळी पावसाचा फटका बसला. दिल्लीतील नजफगड क्षेत्रातील खडखडी नहर गावात पहाटे मुसळधार पावसामुळे घर कोसळून तीन मुलांचा व एका महिलेचा मृत्यू झाला. (Weather Update )
ढगांच्या गडगडाटासह तुफान पाऊस झाला. दिल्लीतील मिंटो पूल व आयटीओसह अनेक वर्दळीच्या रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूककोंडी झाली होती. दिल्लीत तीन तासांत ७७ मिमी पावसाची नोंद झाली. राजस्थानात बहुतांश भागात शुक्रवारी मध्यम व तुफान पाऊस झाला. मात्र, याच राज्यातील जोधपूर व उदयपूर मंडळात उष्णतेची लाट पसरली होती. भरतपूर येथे सर्वाधिक ७७ मिमी पावसाची नोंद झाली. (Weather Update )
हेही पहा-
Join Our WhatsApp Community