राज्यात उन्हाचा कडाका वाढला असताना हवामान विभागाने(Weather Forecast) पावसाचा अंदाज व्यक्त केला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती राजस्थान मध्यप्रदेशसह खालच्या राज्यांपर्यत सक्रिय असल्याने महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तविली जात आहे. पुढील पाच दिवसांत राज्यात अवकाळी पाऊस बरसण्याची शक्यता असून विदर्भासह मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पाऊस पडण्याचा हवामान विभागा(Weather Forecast)चा इशारा आहेत.
(हेही वाचा Weather Update : उत्तरेकडील राज्यांना अवकाळीचा फटका ! वादळामुळे १० जणांचा मृत्यू )
हवामान विभागा(Weather Forecast)ने दिलेल्या अंदाजानुसार सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती राजस्थान सह मध्य प्रदेश व खालपर्यंत सक्रिय असल्याने महाराष्ट्रात पुढील पाच दिवस अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे. दि. ०३, ०४ व ०५ मे रोजी विदर्भासह मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचे इशारे आहेत. त्याचबरोबर, उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातील काही जिल्हांमध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे गेल्या आठवडाभरापासून विदर्भातील काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला होता. हवामान विभागा(Weather Forecast)ने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मुंबई आणि ठाण्यात ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज असून पालघरमध्ये हलक्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
हा पाऊस उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांसाठी दिलासादायक ठरेल. सध्या उत्तर भारतात ईशान्य राजस्थानपासून केरळपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. या हवामान बदलामुळे महाराष्ट्रातही थोड्याफार प्रमाणात आर्द्रता वाढत असून याचा परिणाम म्हणून काही भागांत पावसाचे आगमन होण्याची शक्यता आहे.(Weather Forecast)
Join Our WhatsApp Community