मुंबईतील ‘वेव्हज’ परिषद मनोरंजन क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी ‘दावोस’ ठरणार; DCM Eknath Shinde यांचे विधान 

90
विधानसभेनंतर महापालिकांवर महायुतीचा भगवा डौलाने फडकेल; DCM Eknath Shinde यांचा ठाम विश्वास
  • प्रतिनिधी

मुंबईतील बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटर येथे १ ते ४ मे २०२५ दरम्यान आयोजित ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेन्मेंट समिट’ (वेव्हज) ही परिषद मनोरंजन क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी जागतिक स्तरावर ‘दावोस’ ठरणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी सांगितले. या परिषदेच्या तयारीची पाहणी करण्यासाठी मंगळवारी उपमुख्यमंत्र्यांनी जिओ वर्ल्ड सेंटरला भेट दिली.

उपमुख्यमंत्री शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी दुपारी तीनच्या सुमारास जिओ वर्ल्ड सेंटर येथे भेट देऊन परिषदेच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव नवीन सोना, उद्योग विभागाचे प्रधान सचिव अनबलगन, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारसु उपस्थित होते. परिषदेसंदर्भात सविस्तर सादरीकरणही यावेळी करण्यात आले.

(हेही वाचा – गुजरात पोलिसांनी Bangladeshi Infiltrators च्या अवैध वस्तीवर चालवला बुलडोझर)

उपमुख्यमंत्री शिंदे (DCM Eknath Shinde) म्हणाले की, वेव्हज २०२५ परिषदेचे यजमानपद महाराष्ट्राला मिळणे ही अभिमानास्पद बाब आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे ही परिषद साकार होत आहे. विशेष म्हणजे, पंतप्रधान मोदी १ मे रोजी संपूर्ण दिवसभर मुंबईत उपस्थित राहणार आहेत. ही परिषद भारताची जागतिक स्तरावरील आघाडी सिद्ध करण्यासाठी महत्त्वाची ठरणार असून, मुंबई हे देशाचे आर्थिक आणि मनोरंजन क्षेत्राचे केंद्र आहे. या परिषदेमुळे मनोरंजन क्षेत्राला तांत्रिकदृष्ट्या नवी ओळख मिळेल, असे त्यांनी नमूद केले.

पुढे बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे (DCM Eknath Shinde) म्हणाले की, या परिषदेमुळे आंतरराष्ट्रीय स्टुडिओज, प्रोडक्शन हाऊसेस आणि टेक कंपन्यांसोबत भागीदारीची दारे खुली होतील. यामुळे महाराष्ट्रातील मनोरंजन उद्योगाला नव्या संधी उपलब्ध होऊन आर्थिक प्रगतीला चालना मिळेल. वेव्हज परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असून, ही परिषद मनोरंजन क्षेत्रातील गुंतवणूक आणि नवकल्पनांसाठी मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.