SC On Jayakwadi Dam : मराठवाड्याची तहान भागणार; जायकवाडीमध्ये पाणी सोडण्याविषयी सर्वोच्च न्यायालय अनुकूल

मराठवाड्यातील पाणी प्रश्न मिटला आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यातील पाणी प्रश्नावर राज्यात चर्चा सुरू होती. त्यामुळे मराठवाड्याचा पाणी प्रश्न आता मिटणार असल्याचे सांगितले जात आहे.

55
SC On Jayakwadi Dam : मराठवाड्याची तहान भागणार; जायकवाडीमध्ये पाणी सोडण्याविषयी सर्वोच्च न्यायालय अनुकूल
SC On Jayakwadi Dam : मराठवाड्याची तहान भागणार; जायकवाडीमध्ये पाणी सोडण्याविषयी सर्वोच्च न्यायालय अनुकूल

गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यातील पाणी प्रश्नावर राज्यात चर्चा सुरू होती. (marathwada water crisis) उत्तर महाराष्ट्रातील धरणांमधून जायकवाडी धरणात पाणी सोडले जाणार आहे. मराठवाड्याचा पाणी प्रश्न आता मिटणार असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे. त्यानुसार उत्तर महाराष्ट्रातील धरणांमधून जायकवाडी धरणात 8.5 टीएमसी पाणी सोडले जाणार आहे. (SC On Jayakwadi Dam)

(हेही वाचा – Air Pollution : रस्ते धुण्यासाठी मुंबईत १ हजार टँकर भाड्याने घेणार)

अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणांमधूनही पाणी सोडले जाणार आहे. मुळा (मांडओहोळ मुळा) प्रकल्पातून 2.19 टीएमसी पाणी सोडले जाईल. प्रवरा (भंडारदरा, निळवंडे, आढळा, जापूर) प्रकल्पातून 3.36 टीएमसी पाणी सोडले जाणार आहे. गंगापूर धरणातून (गोदावरी, काश्यपी, गौतमी गोदावरी) येथून 0.5 टीएमसी, तर गोदावरी दारणा (आळंदी, कडवा, भाम, भावली, वाकी, दारणा, मुकणे, वालदेवी) येथून पाणी सोडले जाणार आहे. (SC On Jayakwadi Dam)

काय आहे प्रकरण ?

ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरणांतील पाणी जायकवाडी धरणात सोडू नये आणि गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या पाणी सोडण्याच्या ३० ऑक्टोबर २०२३ च्या आदेशाला स्थगिती मिळावी, यासाठी संजीवनी (टाकळी) सहकारी साखर कारखाना आणि पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे सहकारी साखर कारखाना यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केल्या होत्या.

(हेही वाचा – Israel-Hamas Conflict: मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा इस्रायलकडून निषेध, ‘लष्कर-ए-तोयबा’वर बंदी घालण्यासाठी निवेदन सादर)

या याचिकांना विरोध करण्यासाठी मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज व डॉ. कल्याण काळे यांनी दोन स्वतंत्र हस्तक्षेप अर्ज सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेले होते. यावर सुनावणी घेत सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.

मराठवाड्याला पाणी न देण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचे आंंदोलन

दरम्यान, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातून मराठवाड्याला 8.5 टीएमसी पाणी सोडण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी होऊ नये, यासाठी दोन्ही जिल्ह्यांतील नेत्यांनी सुरू केलेल्या दादागिरीविरोधात मराठवाड्यातील भाजप वगळता सर्वपक्षीय नेत्यांनी संभाजीनगरमधील जालना रोडवर रास्ता रोको केला. जोपर्यंत गोदापात्रात पाणी सोडत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतल्यामुळे जालना रोडवरील वाहतूक तब्बल साडेचार तास ठप्प झाली होती. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून माजी मंत्री राजेश टोपे, अनिल पटेल, माजी आ. कल्याण काळे, कैलास गोरंट्याल यांच्यासह सुमारे १०० आंदोलकांना ताब्यात घेतले. (SC On Jayakwadi Dam)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.