नवी मुंबईत मंगळवारी पाणीपुरवठा बंद

81
नवी मुंबईत मंगळवारी पाणीपुरवठा बंद

जुलै महिन्यात जवळ जवळ संपूर्ण राज्यात पावसाने विक्रमी हजेरी लावली. मात्र असं असूनदेखील अनेक ठिकाणी पाणी कपात करण्यात आली आहे. अशातच नवी मुंबई महापालिकेमार्फत मंगळवारी 8 ऑगस्ट रोजी मुख्य जलवाहिनी दुरुस्ती करण्याचे काम तातडीने हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी सदर जलवाहिनीवरील पाणी पुरवठा 8 ऑगस्ट रोजी बंद राहणार आहे.

(हेही वाचा – Bhalchandra Nemade : ज्ञानपीठ पुरस्कारासाठी चाळणी लावा; नेमाडेंनी पुरस्काराचा अपमान केला – कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजी आंग्रे)

त्यामुळे नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली व ऐरोली या विभागात 08 ऑगस्ट रोजी संध्याकाळी पाणी पुरवठा होणार नाही. तसेच या कालावधीत महापालिका क्षेत्रातील जलवाहिनीवरील थेट नळ जोडण्यांचा व सिडको क्षेत्रातील कामोठे नोड मधील पाणीपुरवठा देखील बंद राहील.

त्याचप्रमाणे बुधवार 9 ऑगस्ट रोजी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. तरी या कालावधीत पाण्याचा वापर जपून करुन नवी मुंबई महापालिकेस सहकार्य करावे, असे नवी मुंबई महापालिकेच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.