Water Shortage : शिर्डी लोकसभा मतदारसंघासह नाशिक, मराठवाड्याला घाटमाथ्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची पंतप्रधानांकडे मागणी

सह्याद्री पर्वतरांगातून समुद्राकडे वाहून जाणारे घाटमाथ्यातील पाणी अडवल्यास ११५ टीएमसी पाणी उपलब्ध होऊ शकते.

228
Water Shortage : शिर्डी लोकसभा मतदारसंघासह नाशिक, मराठवाड्याला घाटमाथ्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची पंतप्रधानांकडे मागणी
Water Shortage : शिर्डी लोकसभा मतदारसंघासह नाशिक, मराठवाड्याला घाटमाथ्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची पंतप्रधानांकडे मागणी

शिर्डी लोकसभा मतदार संघातील पाणीटंचाई कायमस्वरूपी दूर करण्यासाठी घाटमाथ्याचे पाणी शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावे, तसेच अहमदनगर (शिर्डी), नाशिक, मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांना ११५ टीएमसी पाणी उपलब्ध होण्याची मागणी शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी लोकसभेच्या शीतकालीन सत्राच्या शुन्यप्रहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे गुरुवार, ०७ डिसेंबर रोजी केली. (Water Shortage)

सह्याद्री पर्वतरांगातून समुद्राकडे वाहून जाणारे घाटमाथ्यातील पाणी अडवल्यास ११५ टीएमसी पाणी उपलब्ध होऊ शकते. यापैकी १५ टीएमसी पाणी मुळा, गोदावरी व प्रवरा नद्यांवर कोल्हापुरी टाइप बंधारे बांधून या पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांसाठी कायमस्वरूपी केला जाऊ शकतो. तसेच उर्वरित ५ टीएमसी पाणी अकोले-संगमनेर-कोपरगाव-श्रीरामपूर या चार तालुक्यातील वंचित शेतकऱ्यांना उपलब्ध होईल. असे एकूण २० टीएमसी पाणी शिर्डी मतदार संघात उपलब्ध होऊ शकेल व त्‍यांच्या समस्या सुटण्यास मदत होईल. (Water Shortage)

(हेही वाचा – Hashish Oil Seized : २ कोटींचे ‘हशिश ऑईल’ जप्त, तामिळनाडूच्या दोन उच्च शिक्षित तरुणांना अटक)

यासोबतच नाशिकसाठी १० टीएमसी व उर्वरित ८५ टीएमसी पाणीसाठा मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांसा उपलब्ध होण्याबाबतची मागणी त्यांनी लोकसभा अध्यक्षांमार्फत पंतप्रधान यांच्याकडे केली. तसेच यासाठी पंतप्रधानांनी राज्य शासनाकडून याबाबत सविस्तर प्रस्ताव मागवून व त्यास केंद्र सरकारने मंजूरी देण्याबाबतची यावेळी विनंती केली. (Water Shortage)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.