Water Cut : राज्यावर पाणीटंचाईचे सावट; धरणांमध्ये केवळ ५५ टक्के पाणीसाठा

गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या दिवशी ८१ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. छत्रपती संभाजी नगर विभाग विभागात टंचाई भीषण असून, येथील ९२० धरणांमध्ये केवळ ३१.९३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी १ फेब्रुवारी रोजी या धरणांमध्ये ८०.८१ टक्के इतके पाणी शिल्लक होते. त्यामुळे मराठवाड्याला येत्या काळात दुष्काळाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

169
Water Cut : पश्चिम उपनगरातील 'या' भागात शुक्रवार आणि शनिवारी येणार कमी दाबाने पाणी
Water Cut : पश्चिम उपनगरातील 'या' भागात शुक्रवार आणि शनिवारी येणार कमी दाबाने पाणी

गेल्यावर्षी झालेल्या अपुऱ्या पावसामुळे राज्यात पाणीबाणी सदृश स्थिती निर्माण झाली असून, धरणांमध्ये केवळ ५५.०९ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या दिवशी ८१ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. छत्रपती संभाजी नगर विभाग विभागात टंचाई भीषण असून, येथील ९२० धरणांमध्ये केवळ ३१.९३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी १ फेब्रुवारी रोजी या धरणांमध्ये ८०.८१ टक्के इतके पाणी शिल्लक होते. त्यामुळे मराठवाड्याला येत्या काळात दुष्काळाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात स्थिती फारशी समाधानकारक नाही. (Water Cut)

सोमवार (५ फेब्रुवारी) रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील पाणीसाठ्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. त्यानंतर मंगळवारी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी तातडीची बैठक घेत, प्रभावी उपाययोजनांद्वारे पाणी टंचाईवर मात करावी, अशा सूचना केल्या. टंचाई निवारणासाठी सूक्ष्म आराखडा तयार करावा. राज्यात सुरु असलेल्या टँकरचा अहवाल दर आठवड्याला सादर करावा. पाणी पुरवठ्याच्या सुरू असलेल्या योजना कोणत्या टप्प्यात आहेत, सध्या कोणत्या जिल्ह्यात किती टँकर सुरू आहेत या बाबींचा आराखड्यात समावेश असावा. टँकर मंजुरीचे अधिकार प्रांताधिकारी यांना देण्यात यावेत. स्थानिक परिस्थितीनुसार जिल्हाधिकारी आणि प्रांताधिकारी यांनी टँकरबाबत निर्णय घ्यावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. (Water Cut)

(हेही वाचा – Harassment In Mumbai : मालकाच्या छळाला कंटाळून बोटीसह तिघांचे भारतात पलायन)

टँकर्सची संख्या वाढली

भीषण पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या गावांमध्ये टँकर्सची संख्या वाढविण्यात आली आहे. २९ जानेवारी २०२४ च्या आकडेवारीनुसार, राज्यातील ४५६ गावांमध्ये सध्या ५११ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. गेल्यावर्षी या तारखेला टँकर्सची संख्या केवळ २ इतकी होती. छत्रपती संभाजी नगर विभागात टँकर्सची संख्या सर्वाधिक २१६ (१५६ गावे) इतकी आहे. त्या खालोखाल नाशिक विभाग १५२ (३१८ गावे) आणि पुणे विभागात १३९ टँकर्सद्वारे १३८ गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. एकूण ५११ टँकर्सपैकी ४८ शासकीय, तर ४६४ खासगी टँकर्स आहेत. (Water Cut)

राज्यातील धरणांमधील पाण्याची सद्यस्थिती

विभाग २०२४-२०२३
नागपूर – ६२.३८ % – ७५.३२ %
अमरावती – ६५.११ % – ८३.१९ %
औरंगाबाद – ३१.९३ % – ८०.८१ %
नाशिक – ५८.१३ % – ८५.९४ %
पुणे – ५६.८९ % ८०.- ७२ %
कोकण – ६८.९८ % – ७८.८३ %

एकूण – ५५.०९ % – ८०.९४ % (Water Cut)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.