-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई महानगरपालिकेतर्फे घाटकोपर (पश्चिम) येथे पाणीपुरवठाविषयक विविध कामे हाती घण्यात येणार आहेत. ही कामे शनिवार २६ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १० वाजेपासून रविवार २७ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत २४ तासांसाठी हाती घेण्यात येणार आहेत. यामुळे घाटकोपर, विद्याविहार या एन आणि कुर्ला, टिळकनगर या एल विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा शनिवारी २६ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १० वाजल्यापासून रविवार २७ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १० वाजल्यापर्यंत बंद राहणार आहे. संबंधित परिसरातील नागरिकांनी, पाणी काटकसरीने वापरावे असे आवाहन महापालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. (Water Cut)
पाणीपुरवठाविषयक नियोजित विविध कामांमध्ये घाटकोपर (पश्चिम) येथे संत तुकाराम पुलाजवळ १५०० मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवर १२०० मिलीमीटर व्यासाची झडप बसविणे, घाटकोपर उच्चस्तर जलाशयाच्या इनलेटवर १४०० मिलीमीटर व्यासाची झडप बसविणे, ०४ छेद जोडणी (क्रॉस कनेक्शन), १२०० मिलीमीटर X ६०० मिलीमीटर, १५०० मिलीमीटर x ६०० मिलीमीटर, १५०० मिलीमीटर x ३०० मिलीमीटर (०२) व १५०० मिलीमीटर तसेच ९०० मिलीमीटर व्यासाच्या दोन जलवाहिन्यांची गळती दुरुस्ती आदींचा समावेश आहे. (Water Cut)
(हेही वाचा – Pahalgam Terrorist Attack : पाकिस्तान नष्ट केल्यानंतरच दहशतवाद थांबेल; हेमंत महाजन यांनी केले हल्ल्याचे विश्लेषण)
पाणीपुरवठा बाधित होणारा परिसर :
एन विभाग :
भटवाडी, बर्वेनगर, महानगरपालिका वसाहत – ए ते के, काजूटेकडी, रामजी नगर, राम जोशी मार्ग, आझाद नगर, अकबरलाला कंपाउंड, पारशीवाडी, सोनिया गांधी नगर, नामदार बाळासाहेब देसाई वसाहत (शनिवार दिनांक २६ एप्रिल २०२५ रोजी पाणीपुरवठा बंद) (Water Cut)
आनंदगड शोषण टाकी व उदंचन केंद्रावरून पाणीपुरवठा होणारा विभाग, शंकर मंदिर, राम नगर, हनुमान मंदिर, राहुल नगर, कैलास नगर, संजय गांधी नगर, वर्षा नगर, जय मल्हार नगर, खंडोबा टेकडी, रामनगर शोषण टाकी व उदंचन केंद्रावरुन पाणीपुरवठा होणारा विभाग, डी अँड सी महानगरपालिका वसाहत, रायगड विभाग, विक्रोळी पार्क साईटचा काही भाग, सुभाष नगर, शिवाजी नगर, यशवंत नगर, औद्योगिक वसाहत रस्ता, गावदेवी, पठाण चाळ, अमृतनगर, इंदिरा नगर – १, अमिनाबाई चाळ आणि साईनाथ नगरचा काही भाग, गणेश नगर, सागर पार्क, जगदूशा नगर, मौलाना संकुल, कातोडीपाडा, भीमनगर, इंदिरा नगर – २, अल्ताफनगर, गेल्डा नगर, गोळीबार मार्ग, सेवानगर, ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ओ. एन. जी. सी.) वसाहत, माझगाव डॉक कॉलनी, अमृतनगर आसपासचा परिसर, गंगावाडी प्रवेशद्वार क्रमांक २, सिद्धार्थ नगर आणि आंबेडकर नगर, जवाहरभाई प्लॉट, सुरक्षा नगर, नवीन दयासागर, पाटीदार वाडीचा काही भाग, राधाकृष्ण हॉटेलचा मागील भाग, गंगावाडी परिसराचा काही भाग. (शनिवार २६ एप्रिल २०२५ रोजी पाणीपुरवठा बंद) (Water Cut)
(हेही वाचा – Crime : २१ वर्षांपासून फरार साजिद अली शेख अखेर अटकेत; महिलेवर बलात्कार करून केला होता खून)
एल विभाग :
असल्फा गाव, एन. एस. एस. मार्ग, होमगार्ड वसाहत, नारायण नगर, साने गुरुजी उदंचन केंद्र, हिल नंबर ३, अशोक नगर, हिमालय सोसायटी, संजय नगर, समता नगर, गैबण शाह बाबा दर्गा मार्ग. (शनिवार दिनांक २६ एप्रिल २०२५ रोजी पाणीपुरवठा बंद)
संघर्ष नगर, खैराणी मार्ग, यादव नगर, जे. एम. एम. मार्ग, लक्ष्मीनारायण मंदिर मार्ग, कुलकर्णी वाडी, मोहिली जलवाहिनी, भानुशाली वाडी, परेरा वाडी. (रविवारी २७ एप्रिल २०२५ रोजी पाणीपुरवठा बंद) (Water Cut)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community