-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
कांदिवली (पूर्व) येथील ठाकूर संकुलद्वार, पश्चिम द्रुतगती महामार्ग येथे ९०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीसोबत ९०० मिलीमीटर व्यासाची अन्य जलवाहिनी जोडणे व ९०० मिलीमीटर व्यासाची झडप बसविणे ही कामे हाती घेण्यात येणार आहेत. सोमवार, २ जून २०२५ रोजी दुपारी १.३० वाजेपासून मंगळवार, ३ जून २०२५ रोजी सकाळी ७.३० वाजेपर्यंत हे काम करण्याचे नियोजित आहे. (Water Cut)
या कालावधीत म्हणजे सोमवार, २ जून २०२५ रोजी दुपारी १.३० वाजेपासून मंगळवार, दिनांक ३ जून २०२५ रोजी सकाळी ७.३० वाजेपर्यंत संपूर्ण जलवाहिनीचा पाणीपुरवठा बंद करावा लागणार आहे. दुरुस्तीच्या प्रत्यक्ष कालावधीत कांदिवलीत आर दक्षिण विभागातील खालील परिसरांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही. कृपया संबंधित विभागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच पाणीपुरवठा बंदच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. (Water Cut)
(हेही वाचा – World No Tobacco Day : तंबाखू सेवनामुळे वर्षाला १३ लाख लोकांचा मृत्यू)
या विभागात पाणीपुरवठा बंद :
आर दक्षिण विभाग : ठाकूर गाव, समता नगर म्हाडा, चिखलवाडी, जानूपाडा, कांदिवली (पूर्व) (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – सायंकाळी ६.२५ ते रात्री ८.२५) (२ जून २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील). (Water Cut)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community