-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई महानगरपालिका तसेच ठाणे व भिवंडी – निजामपूर महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पांजरापूर येथील उदंचन केंद्रामधील टप्पा क्रमांक १ येथे नवीन दाबवाढ नियंत्रण टाकी (अँटी सर्ज व्हेसल) कार्यान्वित करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. हे काम बुधवार २८ मे २०२५ रोजी सकाळी ९.४५ पासून रात्री १०.४५ वाजेपर्यंत म्हणजेच एकूण १३ तासांसाठी नियोजित आहे. त्यामुळे शहर विभाग आणि पूर्व उपनगरांतील बहुतेक विभागांचा पाणीपुरवठा प्रभावित होणार असून या १३ तासांच्या कालावधीत शहर आणि पूर्व उपनगरांमध्ये १५ टक्के पाणीकपात लागू करण्यात येणार आहे. (Water Cut)
तसेच ठाणे व भिवंडी – निजामपूर महानगरपालिकेच्या हद्दीतील ज्या भागास मुंबई महानगरपालिकेतर्फे पाणीपुरवठा होतो त्या भागांतही ही १५ टक्के पाणीकपात लागू राहणार आहे. त्यामुळे या संबंधित परिसरांमधील सर्व नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून या कालावधीत पाण्याचा वापर काटकसरीने करावे असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. (Water Cut)
(हेही वाचा – अवकाळी पावसामुळे शेतपिकांचे नुकसान, तातडीने पंचनामे करा; मंत्री Makrand Jadhav-Patil यांचे निर्देश)
शहर भागांत याठिकाणी असेल पाणीकपात :
एफ दक्षिण विभाग : (परळ, शिवडी, लालबाग, काळाचौकी)
एफ उत्तर विभाग : (वडाळा, माटुंगा, शीव, अँटॉपहिल)
(हेही वाचा – Terrorism : दहशतवाद सुरूच राहिला तर त्याचे परिणाम भोगावेच लागतील; परराष्ट्रमंत्र्यांचा पाकिस्तानला सज्जड दम)
पूर्व उपनगरातील या भागांत असेल पाणीकपात :
टी विभाग – मुलुंड (पूर्व) आणि (पश्चिम) भाग
२. एस विभाग – भांडुप, नाहूर, कांजूरमार्ग आणि विक्रोळी (पूर्व) भाग
३. एन विभाग – विक्रोळी, घाटकोपर (पूर्व), घाटकोपर आदी भाग
४. एल विभाग – कुर्ला (पूर्व) आणि टिळकनगर,चुनाभट्टी भाग
५. एम पूर्व विभाग : (गोवंडी, देवनार, शिवाजी नगर) पूर्ण विभाग
६. एम पश्चिम विभाग : चेंबूर आणि पासपासचा भाग (Water Cut)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community