Water Conservation Department : सुधारित बृहत आराखडा तयार करत दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन; मंत्री Sanjay Rathod यांची घोषणा

94
Water Conservation Department : सुधारित बृहत आराखडा तयार करत दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन; मंत्री Sanjay Rathod यांची घोषणा
  • प्रतिनिधी

राज्यातील जलसंधारण कामकाज अधिक प्रभावी, पारदर्शक आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुधारित बृहत आराखडा तयार केला जाणार असून त्यासाठी पुणे येथे दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले जाणार आहे, अशी घोषणा मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी बुधवारी केली. याचबरोबर सन २००० पासून रखडलेली १२६७ कामे रद्द करण्याचा निर्णायक निर्णयही यावेळी घेण्यात आला.

मंत्रालयात झालेल्या विभागीय आढावा बैठकीत राठोड यांनी जलतज्ज्ञ, अभियंते आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेतला. त्यांनी स्पष्ट केले की, “जलसंधारण विभाग हा ग्रामीण भागाचा कणा आहे आणि तांत्रिक नवकल्पनांचा वापर करून आपण या विभागाला अधिक सक्षम बनवणार आहोत.” (Water Conservation Department)

(हेही वाचा – Vaishnavi Hagawane Case : निलेश चव्हाणला शस्त्र परवाना गृहविभागाच्या परवानगीने मिळाला?; तपासातून माहिती समोर)

बृहतर आराखड्यासाठी २ दिवसांची कार्यशाळा

पुण्यात होणाऱ्या कार्यशाळेत जलतज्ज्ञ, तांत्रिक अधिकारी, योजनाकार सहभागी होणार असून, जलसंधारणातील संपूर्ण कामांचा आढावा घेत सुधारित आराखडा तयार करण्यात येणार आहे. या कार्यशाळेत विभागातर्फे भविष्यातील योजना, तांत्रिक सुधारणा, आर्थिक नियोजन आदी बाबींचा समावेश असणार आहे. (Water Conservation Department)

रखडलेले आणि अपूर्ण प्रकल्प होणार भूतकाळात

संजय राठोड यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या आणि अपूर्ण प्रकल्पांमुळे विभागावर मोठे आर्थिक दायित्व निर्माण झाले होते. त्यामुळेच ८७२ प्रकल्प जलसंधारण विभागाचे तर ३९५ महामंडळाचे असे एकूण १२६७ प्रकल्प रद्द करण्यात आले आहेत. यामुळे विभागाची आर्थिक जबाबदारी लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. (Water Conservation Department)

(हेही वाचा – Bangalore Stampede: आरसीबीच्या विजयी मिरवणुकीआधी चेंगराचेंगरी; ११ जणांचा मृत्यू, २५ हून अधिक जखमी)

“जलयुक्त शिवार” जिल्हानिहाय पुस्तिकेतून लोकांसमोर

राज्यातील जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार आदी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हानिहाय व राज्यस्तरावरील माहिती पुस्तिका प्रकाशित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामध्ये यशोगाथा, सद्यस्थिती व प्रगतीपथावरील प्रकल्पांची माहिती असेल. (Water Conservation Department)

झरे आणि तलावांवर विशेष भर; पायलट प्रकल्प लवकरच

पावसाअभावी भागात ‘मामा तलाव’, ‘अमृत सरोवर’, व झरे यांचे बळकटीकरण हे प्राधान्यक्रमात असतील. प्रत्येक विभागात पायलट प्रकल्प म्हणून पाच झऱ्यांची तपासणी होणार असून त्यासाठी स्थानिक पातळीवर पाहणी करण्याचे आदेशही देण्यात आले. (Water Conservation Department)

(हेही वाचा – United Nations चा अजब कारभार; तालिबान निर्बंध समितीचे अध्यक्षपद पाकिस्तानकडे)

पदनामात बदल – अभियंत्यांच्या भूमिकेला नवे स्वरूप

जलसंधारण अधिकाऱ्यांऐवजी ‘जलसंधारण अधीक्षक अभियंता’, ‘कार्यकारी अभियंता’ आणि ‘उपअभियंता’ अशी पदनामावली निश्चित करण्याचा प्रस्तावही तातडीने सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. या सर्व निर्णयांमुळे जलसंधारण विभागात कार्यक्षमता, पारदर्शकता आणि गती निर्माण होणार असल्याचे स्पष्ट करत मंत्री संजय राठोड यांनी राज्यभरातील सर्व कामांची स्वतः जिल्हानिहाय पाहणी करण्याची तयारी दर्शवली आहे. “हे पाणी बचावाचे दशक ठरणार आहे,” असेच चित्र या बैठकीतून समोर आले.” (Water Conservation Department)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.