केईएम पाठोपाठ आता शेजारच्या ‘या’ रुग्णालयातही हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सुरु होणार

93
केईएम पाठोपाठ आता शेजारच्या 'या' रुग्णालयातही हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सुरु होणार
केईएम पाठोपाठ आता शेजारच्या 'या' रुग्णालयातही हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सुरु होणार

परळ येथील केईएम रुग्णालया पाठोपाठ वाडिया या लहान मुलांच्या रुग्णालयात आता हृदयप्रत्यारोपण आणि स्वादूपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सुरु केली जाणार आहे. येत्या काही महिन्यात हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी आवश्यक परवाना उपलब्ध होईल, अशी माहिती वाडिया रुग्णालय प्रशासनाकडून दिली गेली. रुग्णालयात हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचा खर्च सर्वसामान्यांना परवडणारा असेल, असेही रुग्णालयाच्यावतीने सांगण्यात आले.

वाडिया रुग्णालय महिला प्रसूती आणि बालरोग उपचारांसाठी ओळखले जाते. १३ एप्रिल २०२३ रोजी पनवेल येथे राहणाऱ्या वृशांत पाटील या लहान मुलाला त्याच्या आईने आपल्या शरीरातील यकृताचा भाग प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी दिला. ही प्रत्यारोपण शस्त्रक्रिया वाडिया रुग्णालयात झाली. गेल्या काही महिन्यात त्याच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येत असल्याचे डॉक्टरांच्यावतीने सांगण्यात आले. वृशांतची आई सुवर्णा पाटीलने वेळीच मुलासाठी योग्य निर्णय घेतल्याचे वाडिया रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले.

(हेही वाचा – ‘इंडिया’च्या बैठकीसाठी राज्य सरकारची मदत घेणार – संजय राऊत)

मुंबईत मुलुंड येथील फोर्टिस, कोकीलाबेन आणि एनएन रिलायन्स रुग्णालयात हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया उपलब्ध आहेत. खासगी रुग्णालयात हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचा खर्च २० लाखांचहून अधिक आकारला जातो. त्या तुलनेत केईएम या पालिका रुग्णालयात आणि वाडिया रुग्णालयात खर्च कमी होईल, अशी आशा अवयवदान चळवळीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.