पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दि. ०२ मे २०२५ रोजी केरळमधील येथील विझिंजम बंदर(Vizhinjam Port) राष्ट्राला समर्पित केले. तब्बल ८ हजार ९०० कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या बंदरातून भारताची सागरी क्षेत्रातून मालवाहतुकीस चालना मिळणार आहे. पंतप्रधान मोदींनी या बंदराला विकासाच्या नव्या युगाचे प्रतीक म्हणून वर्णन केले. लोकार्पण कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान म्हणाले, नवीन बंदराने गेल्या १० वर्षांत सागरी वाहतुकीबाबत देशात सतत बदल कसे झाले आहेत हे स्पष्ट केले.
विझिंजम बंदर इतकं महत्त्वाचं का आहे?
विझिंजम बंदर(Vizhinjam Port) केरळची राजधानी तिरुअनंतपुरम येथे आहे. येथील किनाऱ्यावर विकसित केले गेले आहे. विझिंजम हे खोल पाण्यातील बंदर आहे. म्हणजेच येथील समुद्र १८-२० मीटर खोल असून मोठ्या समुद्री जहाजांना बंदरात येण्यासाठी ही खोली आवश्यक असते. केंद्र सरकारकडून विझिंजम हे ट्रान्सशिपमेंट पोर्ट म्हणून विकसित करण्यात आले आहे.
मोठी मालवाहू जहाजे अशा बंदरांवर माल आणतात आणि नंतर ते इतर लहान जहाजांमध्ये लोड केली जातात. देशातील अशा प्रकारचे पहिलेच बंदर असून त्याची एकूण किंमत ८ हजार ९०० कोटी रुपये आहे. विझिंजम बंदर(Vizhinjam Port) केरळ सरकार, केंद्र सरकार आणि अदानी समूहाने संयुक्तपणे विकसित केले असून अदानी समूहाची उप-कंपनी असलेली अदानी पोर्ट्स हे चालवणार आहे.
दरवर्षी १० लाख कंटेनर उतरवले जाणार
विझिंजम हे ट्रान्सशिपमेंट पोर्ट असून त्याद्वारे २० हजारांपेक्षा जास्त कंटेनर क्षमता असलेली जहाजे येथे डॉक करू शकतात. या आधी भारतात अशी कोणतीही बंदरे नव्हती जिथे इतकी मोठी मालवाहू जहाजे बसू शकतील. त्याचबरोबर आता नव्या बंदरामुळे मदर कार्गो जहाजे नावाची जहाजे येथे थांबू शकतील. मोठ्या जहाजांच्या आगमनामुळे प्रति कंटेनर खर्चही कमी होण्यास मदत होणार आहे.
विझिंजम बंदराच्या विकासामुळे दरवर्षी १८५८ कोटी रुपयांची बचत
विझिंजम बंदर(Vizhinjam Port) बांधण्यापूर्वी देशात येणारे कंटेनर प्रथम दुबई, सिंगापूर किंवा कोलंबो सारख्या बंदरांवर उतरवले जात होते. याला ट्रान्सशिपमेंट म्हणतात. याला प्रमुख कारण म्हणजे भारतात खोल पाण्याचे बंदरे नव्हते. याशिवाय, भारतीय बंदरांमध्येही इतक्या मोठ्या मालवाहू जहाजांना हाताळण्याची क्षमता नव्हती. त्यामुळे हे कंटेनर इतर जहाजांवर लोड करून भारतात आणले जात होते. महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक कंटेनरवर सुमारे १० हजारांचा अतिरिक्त खर्च यायचा. भारतात येणारे सुमारे ७५% कंटेनर या पद्धतीने देशात पोहोचायचे. यामध्येही जास्त वेळ खर्च व्हायचा. या कामासाठी, भारत दरवर्षी या विदेशी बंदरांवर अंदाजे २२० दशलक्ष डॉलर्स म्हणजेच १८५८ कोटी रुपये खर्च करत असे. नव्या विझिंजम बंदरा(Vizhinjam Port)च्या विकासामुळे आता हे पैसे देशाबाहेर जाणार नाहीत.(Vizhinjam Port)
Join Our WhatsApp Community