-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपूल शनिवारी १४ जूनपासून नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. हे पूल वाहतुकीसाठी खुले करण्यात आल्याने प्रवास वेळेत सुमारे ३० मिनिटांची बचत होणार आहे. नागरिकांसाठी संध्याकाळी हे पूल खुले करण्यात आल्याने नियोजित वेळेपूर्वी हे काम पूर्ण करून नागरिकांना दिलासा देण्यात आल्याने भाजपा आणि शिवसेनेच्यावतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानण्यात आले. भाजपा आणि शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली सर्व भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी पुलाच्याठिकाणी एकत्रपणे जमा होत मुख्यमंत्र्यांच्या दुरदृष्टी निर्णयाबाबत आभार मानले. दोन्ही पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत याठिकाणी फुगडी घालत आनंदोत्सव साजरा केला. (Vikhroli Bridge)
(हेही वाचा – दादर पूर्व, वडाळा आणि फाईव्ह गार्डन परिसरातील Food Vendors वर कारवाई करण्याची शिवसेनेची मागणी)
पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता, तसेच नागरिकांची गैरसोय होऊ नये या उद्देशाने कोणत्याही औपचारिक समारंभाची वाट न पाहता विक्रोळी रेल्वे उड्डाणपूल नागरिकांसाठी खुला करावा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महानगरपालिका प्रशासनास दिले होते. मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संमतीने महानगरपालिकेला प्राप्त झालेल्या आदेशानुसार, शनिवारी १४ जून २०२५ सायंकाळी ४ वाजल्यापासून विक्रोळी पूल वाहतुकीस खुला करण्यात आला आहे. (Vikhroli Bridge)
(हेही वाचा – Ahmedabad Plane Crash नंतर एअर इंडियाने 171 क्रमांक केला रद्दबातल)
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांच्या नेतृत्वाखाली विक्रोळी उड्डाणपुलाची उभारणी विहित कालमर्यादेत म्हणजेच ३१ मे २०२५ रोजी पूर्ण करण्यात आली आहे. पूर्व उपनगरातील विक्रोळी येथील रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या या उड्डाणपुलामुळे विक्रोळी पश्चिमेकडील लाल बहादूर शास्त्री मार्ग आणि विक्रोळी पूर्व बाजूस पूर्व द्रुतगती महामार्ग जोडले जाणार आहेत. परिणामी, प्रवास वेळेत सुमारे ३० मिनिटांची बचत होणार आहे. हे पूल कोणत्याही राजकीय पक्षांच्या उपस्थिती ऐवजी महापालिकेच्या पूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत खुले करत हाती बॅनर घेत नागरिकांचे महापालिकेच्यावतीने स्वागत केले. यावेळी प्रमुख अभियंता (पूल) उत्तम श्रोते यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. (Vikhroli Bridge)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community