Vibrant Gujarat 2024 : देश-विदेशातील कंपन्या करणार गुजरातमध्ये गुंतवणूक

रिलायन्स, मारुती , टाटा समूहाचा देखील समावेश

146
Vibrant Gujarat 2024 : देश-विदेशातील कंपन्या करणार गुजरातमध्ये गुंतवणूक
Vibrant Gujarat 2024 : देश-विदेशातील कंपन्या करणार गुजरातमध्ये गुंतवणूक

गुजरातसह देशाच्या औद्योगिकतेला चालना देणाऱ्या व्हायब्रंट गुजरात २०२४ ला उद्योग जगतातून भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. अनेक भारतीय आणि परदेशी कंपन्यांनी राज्यात मोठ्या गुंतवणुकीची घोषणा केलीय. यामध्ये परदेशी कंपन्यांसह रिलायन्स, टाटा सारख्या भारतीय कंपन्यांचा देखील समावेश आहे. (Vibrant Gujarat 2024)

व्हायब्रंट गुजरात २०२४ च्या शुभारंभ प्रसंगी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी पंतप्रधानांच्या कार्य-कर्तुत्वाचे कौतुक करताना घोषणा केली की रिलायन्स हजीरा येथे भारतातील पहिली आणि जागतिक दर्जाची कार्बन फायबर सुविधा उभारणार आहे. रिलायन्स ही गुजराती कंपनी होती, आहे आणि राहील. आगामी २०३० पर्यंत गुजरातच्या उर्जेच्या निम्म्या गरजा अक्षय ऊर्जेद्वारे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करेल. रिलायन्सने जामनगरमध्ये ५ हजार एकर जागेवर धीरूभाई अंबानी ग्रीन एनर्जी गीगा कॉम्प्लेक्सचे बांधकाम सुरू केले आहे. भारताला २०४७ पर्यंत ३५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होण्यापासून जगातील कोणतीही शक्ती रोखू शकत नसल्याचे अंबानी म्हणाले. तसेच २०४७ पर्यंत एकट्या गुजरातची अर्थव्यवस्था ३ ट्रिलियन डॉलर्सची होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (Vibrant Gujarat 2024)

(हेही वाचा – Chandrashekhar Bawankule : मोदी सरकारची गॅरंटी मतांसाठी पुरेशी)

३५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार – तोशिहिरो सुझुकी

देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीनेही व्हायब्रंट गुजरात समिटमध्ये गुजरातमधील गुंतवणुकीबाबत मोठ्या घोषणा केल्या. सुझुकी मोटरचे अध्यक्ष तोशिहिरो सुझुकी म्हणाले की, गुजरातमध्ये दुसरा कार प्लांट तयार करण्यासाठी आम्ही ३५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहोत, जे दरवर्षी १० लाख कारचे उत्पादन करेल. तोशिहिरो म्हणाले की, या प्लांटमधून उत्पादन सुरू झाल्यानंतर गुजरातमध्ये वार्षिक उत्पादन क्षमता २० लाख युनिट्स असेल. सुझुकी मोटरची मारुती सुझुकी इंडियामध्ये सुमारे ५८ टक्के भागीदारी आहे. (Vibrant Gujarat 2024)

२०३०-३१ पर्यंत २० लाख युनिट्सची उत्पादन क्षमता वाढवण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. सध्या मारुती सुझुकी हरियाणा आणि गुजरातमधील त्यांच्या दोन कारखान्यांमध्ये दरवर्षी सुमारे २२ लाख युनिट्सचे उत्पादन करते. याशिवाय, मारुती पहिल्या टप्प्यात ११ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह हरियाणातील सोनीपत येथे एक नवीन प्लांट देखील उभारत आहे. याप्रसंगी टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी घोषणा केली की, टाटा कंपनी गुजरातमधील धोलेरा येथे सेमीकंडक्टर कारखाना उभारणार आहे. टाटा समूह २ महिन्यांत साणंदमध्ये लिथियम आयन बॅटरी बनवण्यासाठी २० जीडब्ल्यू क्षमतेची गिगाफॅक्टरी सुरू करणार आहे. टाटा समूहाच्या १२ कंपन्या गुजरातमध्ये आहेत, ५० हजारांहून अधिक लोकांना रोजगार दिल्याचे त्यांनी सांगितले. (Vibrant Gujarat 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.