क्रांतिकारकांचे मुकुटरत्न असलेले वीर सावरकरजी यांचे जीवन हे मातृभूमीप्रती असलेल्या समर्पणाच्या शिखराचे प्रतीक आहे. राष्ट्र आणि मातृभूमीबद्दलची भावना एखाद्याच्या हृदयात किती खोल असू शकते, हे वीर सावरकर यांच्या जीवनावरून दिसून येते. वीर सावरकरजींचे (Veer Savarkar) विचार आणि त्यांची संघर्षगाथा देशवासीयांना अनंतकाळपर्यंत मातृभूमीप्रती अटळ समर्पण आणि त्यागासाठी प्रेरणा देत राहील, अशी एक्स पोस्ट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केली आहे. २८ मे या दिवशी वीर सावरकर यांची जयंती आहे. त्या निमित्ताने अमित शाह यांनी ही पोस्ट केली आहे.
(हेही वाचा – केंद्रीय गृहमंत्री Amit Shah यांनी तन्मयतेने ऐकले ‘अनादी मी अवध्य मी’ हिंदी अनुवादित गीत)
क्रांतिकारियों के मुकुटमणि वीर सावरकर जी का जीवन मातृभूमि के प्रति समर्पण की पराकाष्ठा का प्रतीक है। किसी के हृदय में राष्ट्र और मातृभूमि के प्रति भाव कितना गहरा हो सकता है, यह वीर सावरकर जी के जीवन से पता चलता है।
वीर सावरकर जी एक विरले स्वतंत्रता सेनानी होने के साथ ही ओजस्वी… pic.twitter.com/MpKmT86oTn
— Amit Shah (@AmitShah) May 28, 2025
या पोस्टमध्ये अमित शाह यांनी म्हटले आहे की, वीर सावरकर हे एक स्वातंत्र्यसैनिक असण्यासोबतच एक शक्तिशाली लेखक देखील होते. त्यांनी अनेक कालातीत रचना लिहिल्या. त्यांनी रचलेल्या ‘अनादी मी… अनंत मी…’ या अमर गाण्याचे हिंदी रूपांतर ऐकून मन भावुक झाले. काल मुंबईत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कुटुंबियांना महाराष्ट्राच्या संस्कृती विभागाच्या वतीने या शक्तिशाली गाण्याच्या सन्मानार्थ ‘छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार २०२५’ देण्याचा मान मिळाला. हिंदी रूपांतरामुळे हे गाणे कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचेल. या गाण्याचे गायक जयदीप वैद्यजी यांचे मी मनापासून अभिनंदन करतो.
अमित शाह यांनी वीर सावरकर जयंतीच्या निमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक निर्मित एका गीताचा व्हिडिओही एक्सवर पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये अमित शाह यांनी म्हटले आहे की, वीर सावरकर यांनी रचलेले ‘अनादि मी… अनंत मी…’ हे गाणे भारतमातेवरील अपार प्रेमाचे प्रतीक आहे आणि प्रत्येक भारतियाच्या भावनिक अभिव्यक्तीचे प्रतीक आहे. हे गाणे हिंदीमध्ये अनुवादित केल्याबद्दल मी संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो. हे अमर गाणे ऐका…
वीर सावरकर जी द्वारा रचित ‘अनादि मी… अनंत मी…’ गीत माँ भारती के प्रति अगाध प्रेम का प्रतीक और हर भारतीय की भावुक अभिव्यक्ति है।
इस गीत का हिंदी भावांतरण करने वाली पूरी टीम को बधाई देता हूँ।
यह अमर गीत जरूर सुनें… pic.twitter.com/VVWBDS5Btq— Amit Shah (@AmitShah) May 28, 2025
नुकतेच ‘अनादि मी अनंत मी…’ या गीताला २७ मे २०२५ या दिवशी वर्षा निवासस्थानी प्रदान करण्यात आला. दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला मिळालेला हा पुरस्कार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांचे नातू रणजित सावरकर आणि नात असिलता सावरकर-राजे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, आमदार संजय उपाध्याय, सांस्कृतिक विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर, सहकार्यवाह स्वप्निल सावरकर, स्मारकाचे अस्थायी विश्वस्त अविनाश धर्माधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. (Amit Shah)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community