Veer Savarkar: ‘हिंदूच हिंदुत्वाच्या विरोधात…’; निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर वीर सावरकर यांचं ‘ते’ वक्तव्य व्हायरल

शरद पोंक्षे यांनी मतमोजणी सुरू असताना ही पोस्ट केली आहे.

139
Veer Savarkar: 'हिंदूच हिंदुत्वाच्या विरोधात...'; निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर वीर सावरकर यांचं 'ते' वक्तव्य व्हायरल

लोकसभा निवडणुकांचे निकाल मंगळवारी, (४ जून रोजी) जाहीर झाले. बहुतांशी मतदारसंघातील मतमोजणी पूर्ण झाली असून विजयी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे, तर काही ठिकाणी अद्याप मतमोजणी सुरू आहे. निवडणुकांच्या निकालांवर अनेक कलाकार व राजकीय नेते प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. याच दरम्यान, मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी केलेल्या पोस्टने लक्ष वेधलं आहे. इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये ही पोस्ट व्हायरल होत आहे.  (Veer Savarkar)

शरद पोंक्षे यांनी मतमोजणी सुरू असताना ही पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी निवडणुकांचा उल्लेख केला नसला, तरी त्यावर असलेल्या कमेंट्सवरून ती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केलेली पोस्ट असल्याचं दिसून येत आहे. त्यांनी अगदी मोजक्या शब्दांची फेसबुक पोस्ट केली आहे. (Veer Savarkar)

(हेही वाचा – Maharashtra Lok Sabha Election Result : उबाठाचा मुंबईत भगवा नाही तर ‘हिरवा’ विजय; मनसे नेत्याची ठाकरेंवर सडकून टीका )

त्यांनी म्हटलं आहे की, स्वातंत्र्यवीर सावरकरांचं वाक्य पुन्हा खरं ठरलं. ”मला मुस्लिमांची, ख्रिश्चनांची भिती वाटत नाही. मला हिंदूंची भीती वाटते; कारण हिंदूच हिंदूत्वाच्या विरोधात उभे ठाकतात,” अशी पोस्ट शरद पोंक्षे यांनी फेसबुकवर केली आहे. त्यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी खूप कमेंट्स केल्या आहेत.

युझर्सने व्यक्त केल्या प्रतिक्रिया…
”लोकांनी किती मोठी चूक केली हे कळेल साहेब बोलून काही फायदा नाही, चुकूनही सर्व पक्षाचं सरकार एकत्र आलं तर परत सर्व सुरू होईल जर हेच हवं असेल, तर यातून त्यांना कोणीही वाचवू शकणार नाही. नंतर वेळ निघून गेल्यावर वाचवा वाचवा ओरडत फिरतील. देव करो मोदी सरकार परत यावं आणि या देशाला वाचवावं आणि बीजेपीने फोडाफोडीचं राजकारण कमी करून योग्य ते कराव त्याचा फटका जास्त बसला आहे हे कळवा”, अशी कमेंट एका युजरने केली आहे. तर, ”शरदजी कसे आहे नैतिकता सोडून आचरण झालं की हिंदू हिंदूच्या विरोधात उभे ठाकणारच महाभारतामध्ये तर भाऊ भावाविरोधात होते तिथं श्रीकृष्ण देवसुद्धा नैतिकतेच्या बाजूने उभे होते. महाराष्ट्राचे गलिच्छ राजकारण देशभर उमटले,” अशी कमेंट दुसऱ्या एका युझरने केली आहे.

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.