भगूर (नाशिक, Nashik) येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४२ व्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. २८ मे या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या (Veer Savarkar) जन्मस्थळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन आदरांजली वाहिली. जयंतीच्या निमित्ताने (Swatatryaweer Sawarkar Birth Aniversary) सावरकर स्मारक विद्युत रोषणाईने उजळून निघाले.
(हेही वाचा – IPL 2025, Rishabh Pant : हंगामातील शेवटच्या सामन्यात ऋषभ पंतची बॅट तळपली, शतकानंतर सॉमरसॉल्ट)
जयंतीच्या निमित्ताने भोसला मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून लष्करी वेशभूषेत शासकीय इतमामात अभिवादन करण्यात आले. त्यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवर, अनेक राष्ट्रप्रेमी आणि सावरकरप्रेमींनी सावरकर स्मारकाला भेट देऊन अभिवादन केले. वाद्यवृंदाकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अनोखी मानवंदना देण्यात आली. सुरेंद्र जालीहालकर आणि विद्यार्थी यांनी व्हायोलिनवर ‘जयोस्तुते’ हे गीत सादर करण्यात आले.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या (Veer Savarkar) जयंतीनिमित्त राजकीय क्षेत्रातील अनेक मंडळींनी एक्सवर पोस्ट करत त्यांना अभिवादन केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी त्यांच्या निवासस्थानी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी दादर, मुंबई येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने निर्मिलेला ‘अनादि मी अनंत मी’ या हिंदी गीताचा व्हिडिओ एक्सवर पोस्ट केला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community