Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकर(Veer Savarkar) राष्ट्रीय स्मारकाच्यावतीने देण्यात येणारा स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृतीचिन्ह पुरस्कार डॉ. विजय सखाराम जोग यांना प्रदान करण्यात आला. स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्या १४२व्या जयंतीनिमित्त रविवार, २५ मे या दिवशी आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार भूतपूर्व मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर व स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांच्या हस्ते देण्यात आला.
पुरस्कार विजेते डॉ. विजय सखाराम जोग आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृतिचिन्ह पुरस्काराने गौरविल्याबद्दल मी स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) राष्ट्रीय स्मारकाचे आभार मानतो. नागपूर येथील वीर सावरकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उभारणीचा किस्सा त्यांनी सांगितला. जोग म्हणाले, आम्ही तत्कालीन आरएसएस प्रमुख, काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे आणि नागपूरचे तत्कालीन महापौर यांना आमंत्रित केले होते. त्यावेळेस काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदेंना पक्षातील जातीवादी लोकांनी त्रास दिला होता.
(हेही वाचा Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य, विज्ञान आणि स्मृतिचिन्ह पुरस्कार प्रदान सोहळा दिमाखात झाला संपन्न )
ते पुढे म्हणाले, सुशीलकुमार शिंदेंनी त्यांच्या स्वीय सचिवांना माझ्या घरी पाठवून भाषणाची क्लीप मागितली. ती क्लीप घेऊन ते थेट दिल्लीत वरिष्ठांना भेटायला गेले. इंदिराजींना भेटल्यानंतर त्या म्हणाल्या मला काही क्लीप वगैरे दाखवायची गरज नाही. मला स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अतिशय आदर आहे, असे त्यावेळेस इंदिरा गांधींनी म्हटल्याचेही जोग यांनी सांगितले आणि त्या इंदिरा गांधींचे जे कुणी आज आहेत ते काय बोलतात हे आपल्या सर्वांना माहीत आहे, असेही ते म्हणाले.
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सहा सोनेरी पानं हे पुस्तक लिहिलं. मी ३५ वर्षापूर्वी केलेल्या भाषणात असं म्हटलं होतं की, स्वातंत्र्यवीर सावरकर आज हयात असते तर अयोध्येतल्या ६ डिसेंबर १९९२ रोजी झालेल्या वादग्रस्त वास्तूच्या विल्हेवाटेला त्यांनी भारतीय इतिहासातलं सातव सौंदर्य पान म्हटलं असतं. ते पुढे म्हणाले, सावरकर असते तर २२ जानेवारी रोजी रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा ज्या दिवशी झाली त्याबद्दल स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हे भारतीय इतिहासातलं आठवं सोनेरीपान म्हटलं असतं, असे सांगत डॉ. जोग यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.
(हेही वाचा “….तोपर्यंत जगात कोणीही त्याची काळजी करणार नाही.”; RSS सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे प्रतिपादन )
ते पुढे म्हणाले, जगाच्या इतिहासातून पाकिस्तान नावाचा देश नष्ट झाला असता तर ‘सहा सोनेरीपाने’ या पुस्तकाचं सार्थक झालं असतं असं मला स्वतःला वाटते. असे सांगतानाच तो आज ना उद्या तो नष्ट होणारच आहे याची सावरकरांप्रमाणे आम्हालाही खात्री असून अखंड भारत देखील होणार आहे. सावरकर आणि आंबेडकर यांच्या एकत्रित कार्यक्रमाबाबत बोलताना म्हणाले, मालवणला एकदा सावरकर आणि आंबेडकरांचा एकत्रित कार्यक्रम होता. बाबासाहेबांना काही कामामुळे उपस्थित राहता आलं नाही. त्या भाषणात सावरकर म्हणाले होते, मी उच्चवर्णात जन्माला आलो याचा मला काही आनंद नाही, अपराधही नाही. पण मी दलित जातीत जन्माला आलो असतो तर मी तसंच बोललो असतो जे आज बाबासाहेब आंबेडकर बोलत आहेत. असे सांगत डॉ. जोग यांनी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे यांनी लिहिलेल्या ‘लोकमान्यतेचे महात्मा’ पुस्तकाचा दाखला यावेळी दिला.
मी मार्क्सवादी आहे आणि सावरकरांना मानतो याचे कारण, इतिहासात दोनच अशी व्यक्तिमत्त्व होऊन गेली ज्यांनी १८५७च्या युध्दाला बंड न म्हणता १८५७चं स्वातंत्र्य समर म्हटलं. हाच कार्ल मार्क्स आणि स्वातंत्र्यवीर सावरकर(Veer Savarkar) यांच्यातला समान दुवा असल्याचेही ते म्हणाले. इतिहासाचं ओझं नको आणि त्याचं दफन करू नका, म्हणून इतिहास वाचत चला, असे आवाहनही डॉ. विजय जोग यांनी उपस्थितांना केले.(Veer Savarkar)
या कार्यक्रमाला मुंबईचे भूतपूर्व पोलीस आयुक्त विवेक फणसळकर प्रमुख पाहुणे उपस्थित होते. ब्रिगेडियर (नि.) हेमंत महाजन याची विशेष उपस्थिती होती. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर आणि स्मारकाचे सह कार्यवाह स्वप्नील सावरकर हे उपस्थित होते.
Join Our WhatsApp Community