Veer Savarkar Sanskar Shala : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४२ व्या जयंतीनिमित्त वंचित मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अनोखा उपक्रम

Veer Savarkar Sanskar Shala : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या १४२व्या जयंतीनिमित्त बुधवार, २८ मे दिवशी वीर सावरकर संघटनेने आर्थिकदृष्ट्या वंचित मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी 'वीर सावरकर संस्कार शाळा'(Veer Savarkar Sanskar Shala)चे उद्घाटन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करताना म्हटले की, सामाजिक प्रबोधनाचे सर्वात महत्त्वाचे माध्यम म्हणजे शिक्षण, ज्याद्वारे व्यक्तीचा सर्वांगीण विकास साधणे शक्य आहे.(Veer Savarkar Sanskar Shala)

55

Veer Savarkar Sanskar Shala : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या १४२व्या जयंतीनिमित्त बुधवार, २८ मे दिवशी वीर सावरकर संघटनेने आर्थिकदृष्ट्या वंचित मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘वीर सावरकर संस्कार शाळा'(Veer Savarkar Sanskar Shala)चे उद्घाटन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करताना म्हटले की, सामाजिक प्रबोधनाचे सर्वात महत्त्वाचे माध्यम म्हणजे शिक्षण, ज्याद्वारे व्यक्तीचा सर्वांगीण विकास साधणे शक्य आहे.(Veer Savarkar Sanskar Shala)

(हेही वाचा ९०० वर्षे जुने Shiv Temple अन् थायलंड-कंबोडिया यांच्यात ६३ वर्षांपासून वाद; एका सैनिकाच्या मृत्यूमुळे पुन्हा चर्चेत, नेमकं प्रकरण काय? )

तसेच, वीर सावरकर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कुलदीप स्वेदिया म्हणाले की, संस्थेचे उद्दिष्ट केवळ औपचारिक शिक्षणापुरते मर्यादित नसून देशभक्ती, नैतिक मूल्ये आणि व्यावहारिक कौशल्यांद्वारे मुला-मुलींचे सर्वांगीण चारित्र्य घडविणे आहे. यावेळी मुख्य वक्ते राजेंद्र पंत, राज्य सामाजिक सौहार्द संयोजक (आरएसएस), प्रमुख पाहुणे जितेंद्र यादव स्वामी डीडी कॉलेज, कार्यक्रमाचे अध्यक्ष जोगेंद्र सिंह पुंडीर प्रदेशाध्यक्ष किसान मोर्चा, (भाजपा), विशेष पाहुणे नीरज सेमवाल सीओ सीआयडी डेहराडून, अनुज आर्य सीओ एमआयटी डेहराडून, बाबा भवानी गिरी महाराज संस्थापक संतोषी माता मंदिर आदी मान्यवर उपस्थित होते.

मुलांसाठी कार्यशाळा आयोजित

वीर सावरकर संस्कार शाळे(Veer Savarkar Sanskar Shala)द्वारे मोफत दर्जेदार शिक्षण दिले जाते. राज्य शैक्षणिक मानकांनुसार, इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचा अभ्यासक्रम प्रशिक्षित आणि सेवाभावी शिक्षकांकडून शिकविला जातो. संस्कार आणि नैतिक शिक्षण, दररोज प्रार्थना, देशभक्तीपर गाणी, महापुरुष, क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या चरित्रांवर चर्चा करण्यात येते. नियमित शिक्षण सत्रे आणि गट उपक्रम, कौशल्य विकास, शालेय अभ्यासक्रम, संगणक साक्षरता, योग, संगीत, चित्रकला, क्रीडा आणि नेतृत्व विकास कार्यशाळा, पोषण आणि आरोग्य शिबिरे आणि नियतकालिक वैद्यकीय तपासणी, समुदाय सहभाग, पालक-शिक्षक संवाद, स्वच्छता मोहीम आणि वृक्षारोपण यांसारखे उपक्रम राबविले जातात.(Veer Savarkar Sanskar Shala)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.