Veer Savarkar यांच्या १४२व्या जयंतीनिमित्ताने मोडीलिपी स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार प्रदान

Veer Savarkar :   स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक व जागतिक मोडीलिपी प्रसार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शीघ्र मोडीलिपी लिप्यंतर स्पर्धा २०२५ आणि सुंदर मोडी हस्ताक्षर स्पर्धा २०२५ या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेच्या विजेत्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्या १४२व्या जयंतीदिनाचे औचित्य साधून विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

125

Veer Savarkar :   स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक व जागतिक मोडीलिपी प्रसार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शीघ्र मोडीलिपी लिप्यंतर स्पर्धा २०२५ आणि सुंदर मोडी हस्ताक्षर स्पर्धा २०२५ या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेच्या विजेत्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्या १४२व्या जयंतीदिनाचे औचित्य साधून विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, सावरकर विचार प्रसारक डॉ. विजय सखाराम जोग यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

(हेही वाचा हिंदूंनी भारताला हिंदु राष्ट्र करण्यासाठी आवश्यक पाऊले उचला; MLA T Raja Singh यांची मागणी )

शीघ्र मोडीलिपी लिप्यंतर स्पर्धेत प्रथम क्रमांक भाऊराव घाडीगावकर, द्वितीय क्रमांक प्रदीप कणसे व तृतीय क्रमांक डॉ. राहुल सारडा यांनी पटकाविला. तसेच, सुंदर मोडी हस्ताक्षर स्पर्धेत प्रथम क्रमांक डॉ. राहुल सारडा, द्वितीय क्रमांक भाऊराव घाडीगावकर व तृतीय क्रमांक अनिल धुरी यांनी पटकाविला. ‘मृत्युंजय सावरकर’ एकपात्री नाटकाच्या संपूर्ण टीमचे मान्यवरांकडून स्वागत करण्यात आले. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्षा मंजिरी मराठे, मोडीलिपी शिक्षक तथा अभ्यासक राजेश खिलारी उपस्थित होते.

‘मृत्युंजय सावरकर’ नाटकाचे सादरीकरण

यानंतर वीर सावरकर (Veer Savarkar) यांच्या तेजस्वी जीवनकार्यावर आधारित एकपात्री नाटक ‘मृत्युंजय सावरकर’चे सादरीकरण करण्यात आले. लेखक, कवी, निर्माता आणि दिग्दर्शक अनिल शेंडे लिखित व सिने कलाकार अनिल पालकर अभिनयित ‘मृत्युंजय सावरकर’ या वीर सावरकर (Veer Savarkar) यांच्या एकपात्री नाटकाला प्रेक्षकांनी यावेळी भरभरून प्रतिसाद दिला.(Veer Savarkar)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.