Veer Savarkar Jayanti : स्वप्नील सावरकर यांचा माजी खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते सत्कार

Veer Savarkar Jayanti : स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान समिती व पोयसर जिमखाना आयोजित १४२वी स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती(Veer Savarkar Jayanti) महोत्सव २०२५ या कार्यक्रमाचे बुधवार, २८ मे २०२५ या दिवशी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे सह कार्यवाह आणि हिंदुस्थान पोस्टचे संपादक स्वप्नील सावरकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

129

Veer Savarkar Jayanti : स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान समिती व पोयसर जिमखाना आयोजित १४२वी स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती(Veer Savarkar Jayanti) महोत्सव २०२५ या कार्यक्रमाचे बुधवार, २८ मे २०२५ या दिवशी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे सह कार्यवाह आणि हिंदुस्थान पोस्टचे संपादक स्वप्नील सावरकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान, बोरिवली पश्चिम येथील कार्यक्रमात विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेल्या संपादक स्वप्नील सावरकर यांचा माजी खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते प्रतिमा, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. (Veer Savarkar Jayanti)

(हेही वाचा वीर सावरकरांचा त्याग राष्ट्रासाठी प्रेरणादायक; Amit Shah यांची एक्सवर भावूक पोस्ट )

माजी खासदार गोपाळ शेट्टी म्हणाले की असे कार्यक्रम आयोजित केले पाहिजेत. कारण यातूनच तरुण पिढी घडणार आहे. देशासाठी सर्वोच्च त्याग केलेले सावरकर हे प्रेरणास्त्रोत आहेत. तसेच, भाजप आमदार संजय उपाध्याय यांनी स्वप्नील सावरकर यांचे कौतुक करताना म्हटले की, स्वप्नील सावरकर हे सावरकरांचे विचार लोकांपर्यंत पोहोचावेत यासाठी कार्य करत आहेत. तसेच ते सहकार्यवाह असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाकडून सावरकरांवरील हिंदी कविता व गीतांचे संकलन केले जात आहे, हे कौतुकास्पद आहे. तसेच, सावरकरांविषयी कृतज्ञ भाव व्यक्त करत ते म्हणाले, सावरकरांना देशात सर्वोच्चपद जरी मिळाले नसले तरी देशभर सावरकर जयंती(Veer Savarkar Jayanti) जल्लोषात साजरी होते. सावरकर हे खरे देशभक्त होते, असेही ते म्हणाले.

सावरकरांच्या जयंती(Veer Savarkar Jayanti)निमित्त आयोजित कार्यक्रमात सावरकर रचित गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत बर्वे यांनी केले. तसेच, पल्लवी केळकर आणि निलेश निरगुडकर यांनी सुमधूर आवाजात गीत सादर केले. यावेळी माजी खासदार गोपाळ शेट्टी, स्वप्नील सावरकर आणि आमदार संजय उपाध्याय यांची प्रमुख उपस्थिती होती. तर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.(Veer Savarkar Jayanti)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.