स्वप्निल सावरकर
२८ मेच्या दिवशी अख्ख्या देशात सावरकर (Veer Savarkar) जयंती साजरी होत असताना राहुल गांधी मात्र न्यायालयातून सुटकेसाठी धडपडताना दिसत आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संदर्भात वारंवार केलेल्या खोट्या आरोपांमुळे राहुलबाबा आता भलताच अडचणीत आला आहे. स्वातंत्र्यवीरांचे धाकटे बंधू नारायणराव सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर (Satyaki Savarkar) यांनी केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यामुळे राहुल गांधीची (Rahul Gandhi) कोंडी झाली आहे. (Veer Savarkar Defamation Case)
राहुल गांधीला चक्क शिक्षा होण्याची भीती वाटू लागली
मुस्लिम लांगुलचालन करता करता स्वतःचा धर्म, जात विसरलेल्या राहुलला फक्त निवडणुकीच्या काळात मंदिरं आठवतात. कोटावर जानवं घालण्यापासून दाढी वाढवून, भगवी उपरणी घालण्यापर्यंतची स्टंटबाजी करावी लागते, यातच सर्व काही आलं. पण, आता पुण्यासारख्या छोट्या शहरातल्या न्यायालयात अखिल भारतीय काँग्रेसच्या सर्वेसर्वा असणाऱ्या राहुल गांधीला हजेरी लावावी लागण्याची आणि चक्क शिक्षा होण्याची भीती वाटू लागली. तीही एका साध्या अब्रुनुकसानीच्या खटल्यामुळे!
(हेही वाचा – West Bengal Bangladeshi infiltrators : कूचबिहार जिल्ह्यातून महिला आणि मुलांसह २८ बांगलादेशी घुसखोरांना अटक)
मंडळींची शेवटची तडफड सुरू
स्वातंत्र्यवीरांना माफीवीर म्हणणारा हा राहुल गांधी मोदींना चौकीदार चोर है म्हणाला होता. आणि नंतर, सर्वोच्च न्यायालयात जाहीर माफी मागूनच सुटला होता, हे सोयीस्कररीत्या विसरतो. न्यायालयं म्हणजे यांच्या …जाद्यांची इस्टेट असल्यासारखेच आजवर हे वागत आले. त्यांच्या पूर्वजांनी ६० वर्षांत पेरलेलं आणि सध्या अस्तित्वात असलेलं सरकारी यंत्रणेतील भ्रष्ट तण नष्ट व्हायला निश्चित वेळ लागणार आहे. पण, आता तणनाशक फॉर्म्युला म्हणून तिसऱ्यांदा हिंदुत्ववादी सरकार जनतेनं निवडून दिल्याने या मंडळींची शेवटची तडफड सुरू आहे.
इटालियन कनेक्शनचे काय करायचे ?
आता काय तर, सात्यकी सावरकरांच्या आईचे नथुराम गोडसेंशी नाते असल्याचे प्रतिज्ञापत्रात सांगत स्वतःची कातडी वाचवण्याची बेशरम धडपड या राहुल गांधीने केली आहे. या भाऊंचे जे कोणी सल्लागार आहेत, त्यांच्याही अकलेचे किती दिवाळे वाजले आहे, हेच यातून दिसते. आपल्या कायद्यात या नात्यांचा कोणताही संबंध गृहीत धरण्याची पद्धत नाही. आणि असती तर, या भाऊंचे इटालियन कनेक्शन जे डॉ. सुब्रमण्यम स्वामी जगाला ओरडून सांगतच नाही, तर न्यायालयातही याबाबत खटले प्रलंबित आहेत, त्याचे काय करायचे? आपल्या आईची पार्श्वभूमी, गांधी आडनावाचा इतिहास, जात-धर्माबाबत असलेलं संशयाचं धुकं याचं काय करायचं?
राहुल गांधींनी इतिहासात डोकावण्याची संधी
साधी जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णयही आपल्यामुळेच झाला असा दावा करणारा राहुलबाबा स्वतःची जात कोणती हे मात्र आजही गुलदस्त्यात ठेवतो. हे कशासाठी? त्याचे पोपट त्याच्या जातीबद्दल विचारल्यावर भलतीच विठू विठू करून मीडियाचे लक्ष दुसरीकडे वळवण्याची धडपड का करतात? पण म्हणतात ना, जे होतं ते चांगल्यासाठीच. त्यानुसार, राहुल गांधींनी एकप्रकारे इतिहासात डोकावण्याची संधी स्वतःहूनच दिली आहे. आता न्यायालयाने खरंच प्रामाणिक न्यायदानासाठी प्रयत्न केले तर दोन्ही बाजूंचा (खरा) इतिहास समोर आणण्याचे आदेश द्यावेत.
चला तर होऊनच जाऊ द्यात, राहुलबाबा तुम्ही तुमचा इतिहास, नातीगोती, जात-धर्म, कमाईचे स्रोत सर्व काही प्रतिज्ञापत्राद्वारे उघड करा. आणि, सात्यकी सावरकरांसह सर्व सावरकर कुटुंबीयही तेच करतील. बोला… आहे हिंमत? (Veer Savarkar Defamation Case)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community