Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य, विज्ञान आणि स्मृतिचिन्ह पुरस्कार प्रदान सोहळा दिमाखात झाला संपन्न 

Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४२व्या जयंतीनिमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे शौर्य, विज्ञान आणि स्मृतीचिन्ह पुरस्कार प्रदान सोहळा रविवार, २५ मे २०२५ या दिवशी सायंकाळी ७ वाजता स्मारकाच्या सावरकर सभागृहात अत्यंत दिमाखात संपन्न झाला.

79

Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४२व्या जयंतीनिमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे शौर्य, विज्ञान आणि स्मृतिचिन्ह पुरस्कार प्रदान सोहळा रविवार, २५ मे २०२५ या दिवशी सायंकाळी ७ वाजता स्मारकाच्या सावरकर सभागृहात अत्यंत दिमाखात संपन्न झाला. यावेळी वीर सावरकर (Veer Savarkar) यांच्या आदर्श विचारांना अनुसरून संरक्षण, विज्ञान क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या व्यक्ती तसेच सावरकर विचारांच्या प्रचार-प्रसारात योगदान देणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले.

 

पुरस्कार प्रदान सोहळ्यात स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांनी प्रास्ताविकपर भाषण केले. स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांनी नागरिकांमध्ये प्रखर राष्ट्रप्रेम जागृत केले तसेच स्वातंत्र्य चळवळीत ब्रिटिशांच्या विरोधात लढताना सैनिकी शिक्षणाचा आग्रह धरत त्याचे महत्त्व पटवून दिले. सैनिकीकरणाविषयी वीर सावरकर यांनी मांडलेले विचार कालातीत आहेत. आजही वारंवार त्याची प्रचिती येत असते. या पार्श्वभूमीवर त्यांच्या विचारांचे स्मरण करण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार दिला जातो. यंदाचा स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार ४थी बटालियन, मराठा लाईट इन्फ्रंट्रीचे लेफ्ट कर्नल अनिल अर्स (वीरचक्र) यांना देण्यात आला. सध्या लेफ्ट कर्नल अनिल अर्स सीमेवर कर्तव्यावर असल्याने त्यांच्यावतीने त्यांची पत्नी मंजु सिंह अर्स यांनी हा पुरस्कार स्वीकारला. मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि १ लाख १००१ रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

WhatsApp Image 2025 05 25 at 10.40.31 PM 1 1

(हेही वाचा maharashtra rain alert : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस; हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो वाचा… )

वीर सावरकर (Veer Savarkar) यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात विज्ञानवादाचा पुरस्कार केला. देशाला विकासाच्या मार्गावर घेऊन जाण्यासाठी विज्ञानाची कास धरण्याची आवश्यकता असल्याचे विचार वीर सावरकर यांनी मांडले. याच विचाराच्या अनुषंगाने विज्ञान क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणार्‍या व्यक्तीला स्वातंत्र्यवीर सावरकर विज्ञान पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. आय.आय.टी. मुंबईचे उप-संचालक डॉ. मिलिंद अत्रे यांना स्वातंत्र्यवीर सावरकर विज्ञान पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानपत्र, स्मृतिचिन्ह, रू. ५१,००० असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

 

त्याचबरोबर वीर सावरकर यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य करणाऱ्या व्यक्तींना स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृतिचिन्ह पुरस्कार दिला जातो. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विजय सखाराम जोग यांना स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृतिचिन्ह पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्मृतीचिन्ह, मानपत्र आणि २५,००० रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

WhatsApp Image 2025 05 25 at 10.40.31 PM 1

तर प्रकृति अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू न शकलेले वैद्य चिंतामण नारायण साठे यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्याच्या कार्यात योगदान दिल्याबद्दल स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृति पुरस्कार त्यांच्या निवासस्थानी प्रदान करण्यात येणार आहे.

वरील सर्व पुरस्कार भूतपूर्व मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर व स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. याप्रसंगी पुरस्कार प्राप्त मान्यवरांनी त्यांचे मनोगत मांडले. या कार्यक्रमात ब्रिगेडियर (नि.) हेमंत महाजन यांची विशेष उपस्थित होती. त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यानंतर भूतपूर्व पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनीही उपस्थितांना संबोधित केले. रणजित सावरकर यांनी समारोपीय भाषण केल्यावर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.(Veer Savarkar)

(हेही पाहा)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.