Veer Savarkar Award : ‘क्रायोजेनिक तंत्रज्ञानात भारत लवकरच जगात नंबर १ होईल’; ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. मिलिंद अत्रे यांनी व्यक्त केला विश्वास 

Veer Savarkar Award : आयआयटी मुंबईचे उप संचालक, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. मिलिंद अत्रे यांना स्वातंत्र्यवीर सावरकर विज्ञान पुरस्कार २५ मे २०२५ रोजी दादर, स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह येथील आयोजित पुरस्कार सोहळ्यात प्रदान करण्यात आला.

77

Veer Savarkar Award : आयआयटी मुंबईचे उप संचालक, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. मिलिंद अत्रे यांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर विज्ञान पुरस्कार २५’ स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहामध्ये रविवार, २५ मे या दिवशी आयोजित पुरस्कार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना डॉ. अत्रे म्हणाले की, गेले २० वर्ष मी क्रायोजेनिक इंजिनिअरिंग शिकवतो. हा एक खूप सुपर स्पेशालिस्ट विभाग असून क्रायोजेनिक इंजिन आपल्याला रशियन टेक्नॉलॉजीकडून मिळणार होते. पण, अमेरिकेने तेव्हा आडकाठी आणली होती. ती टेक्नॉलॉजी आणायला आपल्याला २० वर्षे लागली आणि २०१८ मध्ये आपले पहिले क्रायोजेनिक इंजिन आकाशात झेपावल्याचे डॉ. अत्रे यांनी सांगितले.

आपण अमेरिका आणि चीनलाही मागे टाकू!

ते पुढे म्हणाले, आज आपले स्पेस नॉलेज आणि सायन्स हे अगदी उच्च दर्जाचे व्हायला लागले आहे. सध्या इस्रोचे तीन शास्त्रज्ञ पीएचडी करत असून त्या सगळ्यांचे काम क्रायोजेनिक इंजिनिअरींगवर चालत आहे. असे सांगतानाच सध्या जगात क्रायोजेनिक तंत्रज्ञान अमेरिका, चीनसोबत आता फक्त भारताकडेच आहे. काही दिवसांनी आपण या तंत्रज्ञानात अमेरिका आणि चीनलाही मागे टाकून जगात अव्वलस्थानी असू आणि लवकरच याविषयातील तंत्रज्ञान, पेटंट्स आपल्याकडे येतील, असा विश्वास आयआयटी मुंबईचे उप संचालक, ज्येष्ठ शास्त्रज्ञ अत्रे यांनी व्यक्त केला.

(हेही वाचा “…तर याहून वेदनादायी दुसरं काहीच असू शकत नाही”; Veer Savarkar पुरस्कार सोहळ्यात विवेक फणसळकरांनी मांडली परखड भूमिका )

लहानपणापासूनच वीर सावरकरांच्या व्यक्तिमत्वाचे विलक्षण आकर्षण

पुरस्कार प्राप्त डॉ. अत्रे म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर विज्ञान पुरस्कार(Veer Savarkar Award) स्वीकारताना अगदी मन भरून येत आहे. याचे कारण एक की, आमचे पूर्ण शिक्षणच वीर सावरकरांचे अनुयायी असलेल्या शिक्षकांच्या मुशीतून झाले आहे. तिथे सावरकरमय वातावरण फार अधिक होते. त्यामुळे वीर सावरकरांच्या नावाने मला सन्मान मिळाला याचा मला अभिमान वाटतो. लहानपणापासूनच मला वीर सावरकरांच्या व्यक्तिमत्वाचे विलक्षण आकर्षण होते. त्यांच्या कवितांचे, लिखाणांचे मनावर संस्कार होत गेले. त्यांच्या अंधश्रद्धा विरुद्ध भूमिका आणि विज्ञान पुरस्कृत विचार मनावरती अगदी बिंबवले गेल्याचेही अत्रेंनी यावेळी सांगितले.

विज्ञानाला देशसेवेचे शस्त्र मानले पाहिजे!

भारतीय शिक्षणपध्दतीवर भाष्य करताना डॉ. अत्रे म्हणाले, आपल्याला अध्ययन आणि अध्यापनाची पद्धत पूर्णतः बदलली पाहिजे. आर्टिफिशिल इंटेलिजन्सच्या माध्यमाचा वापरदेखील केला पाहिजे असे सांगतानाच स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जे ५० वर्षांपूर्वी म्हणून ठेवले होते की शिक्षण हे जे आहे ते आपल्या देशाला सध्या काय हवे आहे त्याप्रमाणे निर्णय घेतले पाहिजेत. सावरकरांनी नवभारताच्या उभारणीत विज्ञानाला स्वातंत्र्य मानले, पण आपणही विज्ञानाला देशसेवेचे शस्त्र मानले पाहिजे. आज विज्ञानाला देशसेवेचे शस्त्र मानले गेले पाहिजे. आम्ही एक नवीन सेंटर फॉर डिफेन्स टेक्नॉलॉजी इनोव्हेशन अँड स्ट्रॅटेजी हे आधीच सुरु केले आहे. आमच्याकडे पुढच्या वर्षापासून आम्ही इथे M. Techचा प्रोग्राम सुरू करत आहोत, अशी घोषणा डॉ. अत्रेंनी पुरस्कार सोहळ्यात केली.

(हेही वाचा Veer Savarkar :   डॉ. विजय जोग यांचा स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृतीचिन्ह पुरस्काराने गौरव; म्हणाले, “मी मार्क्सवादी तरी सावरकरप्रेमी, कारण…” )

विज्ञानाचा विषय म्हटले की मुलांचं शिक्षण हे फ्लेक्सिबल व्हायला हवे असे सांगतानाच वर्टिकल सायलो मेकॅनिकल इलेक्ट्रिकल यामध्ये न टाकता त्यांना चार पाच इम्पॉर्टंट विषय शिकवले पाहिजे. बाकी सर्व विषय मुलांच्या आवडीवर सोडले पाहिजेत, ज्यांना सेमीकंडक्टरमध्ये जायचं, हायड्रोजनमध्ये जायचं आहे. किंवा नवीन टेक्नॉलॉजीमध्ये ज्यांना जायचं आहे, त्यांना आपण जास्तीत जास्त फ्लेक्सिबिलिटी ऑफ एज्युकेशन दिले पाहिजे, असे मत डॉ. मिलिंद अत्रेंनी यावेळी मांडले.

पुरस्कार देशाच्या युवा पिढीला समर्पित!

तसेच, एम्पल सेमीकंडक्टरची गरज असून चीनकडे असलेली लिथियम बॅटरी आपल्याला भारतात निर्माण करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने आपण बॅटरी सेंटर, इलेक्ट्रिक व्हेइकल सेंटर काढली आहेत. आगामी २०५०च्या दृष्टीने अॅडव्हान्स एरोस्पेस इंजिनिअरिंगचा पण आपण विचार करतो आहोत. स्पेस, डीआरडीओ, डिफेन्स अटॉमिक एनर्जी यांच्याशी बराच संपर्कात असतो असे सांगतानाच मी स्वतः यांच्याशी संशोधन कार्यानिमित्त जोडलेला असतो. त्यामुळे तिथे काय डेव्हलपमेंट सुरू आहेत, याचे इत्थंभूत ज्ञान मिळते. समारोपाकडे वळताना डॉ. अत्रे म्हणाले, हा पुरस्कार माझ्यासाठी एक नवीन प्रवासाची सुरुवात असून तो मी माझ्या आपल्या देशाच्या युवा पिढीला समर्पित करतो.(Veer Savarkar Award)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.