Veer Savarkar 2025 : ‘जेव्हा आपण सुज्ञपणे मतदान करतो तेव्हा आपण सैन्यावरील भार कमी करतो, तेव्हा आपण आपल्या सैन्याच्या पाठीशी उभे राहतो. आपली देशभक्ती दाखवण्यासाठी आपण युद्धाची वाट पाहू नये.’, असे स्वांतत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कारार्थी लेफ्टनंट कर्नल अनिल अर्स यांच्या पत्नी मंजू सिंह-अर्स म्हणाल्या. मराठा लाईट इन्फंट्रीचे शौर्य चक्र पुरस्कारप्राप्त लेफ्टनंट कर्नल अनिल अर्स यांना यंदाचा स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार(Veer Savarkar 2025) प्रदान करण्यात आला. भारतीय सीमेवर कर्तव्य बजावत असल्याकारणाने लेफ्ट. कर्नल अनिल अर्स पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहू शकले नाहीत. पत्नी मंजू सिंह-अर्स यांनी त्यांच्यावतीने पुरस्कार स्वीकारला. स्वातंत्र्यवीर सावरकर(Veer Savarkar 2025)यांच्या १४२व्या जयंतीनिमित्त शौर्य, विज्ञान आणि स्मृती पुरस्कार सोहळा(Veer Savarkar 2025) रविवार, २५ मे २०२५ या दिवशी सायंकाळी ७ वाजता स्मारकाच्या सावरकर सभागृहात आयोजित करण्यात आला होता.(Veer Savarkar 2025)
मनोगत व्यक्त करताना मंजू सिंह-अर्स म्हणाल्या की, ‘आज जेव्हा देशात आणि परदेशात ऑपरेशन सिंदूरची चर्चा होत आहे, तेव्हा मला कर्नल अनिल अर्स यांना देण्यात येणारा शौर्य पुरस्कार(Veer Savarkar 2025) स्वीकारण्यासाठी यावे लागले, याचा आनंद आहे. २०२० मध्ये जेव्हा भारत सरकारने कर्नल अनिल अर्स यांची शौर्यचक्रासाठी निवड केली, तेव्हा कर्नाटक सरकारसह इतर स्वयंसेवी संस्थांनीही त्यांचा सन्मान करण्याची इच्छा व्यक्त केली होती,’ असे सांगताना हा टप्पा २०२१ पर्यंत थांबल्याचे त्या म्हणाल्या. परंतु, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने शौर्य पुरस्कार देण्याची घोषणा केल्यानंतर, असे वाटले की कर्नल अनिल अर्स यांच्या शौर्य आणि पराक्रमच्या गाथेची पुनरावृत्ती होत आहे, अशी भावना मंजू सिंह-अर्स यांनी यावेळी व्यक्त केली.
संपूर्ण मराठा रेजिमेंटमध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण होईल!
त्या पुढे म्हणाल्या, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या या निर्णयामुळे केवळ लेफ्टनंट कर्नल अनिल अर्स यांच्यामध्येच नव्हे तर संपूर्ण मराठा रेजिमेंटमध्ये एक नवीन ऊर्जा, उत्साह आणि प्रेरणा निर्माण होईल असा मला पूर्ण विश्वास आहे. जेव्हा-जेव्हा मराठा रेजिमेंटचा प्रत्येक शूर सैनिक कुठेही आणि कधीही शत्रूंवर हल्ला करतो तेव्हा त्यांच्या ओठांवर एक प्रतिध्वनी दूरवर ऐकू येतो आणि तो म्हणजे, ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय.’; असे मंजू सिंह अर्स सांगताच उपस्थितांनी भरभरून दाद दिली. वडील आणि पती यांच्या देशसेवेबाबत बोलताना त्या म्हणाल्या, २०२०च्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला भारत सरकारने कर्नल अनिल अर्स यांना शौर्यचक्र जाहिर केले. तर त्याच वर्षी स्वातंत्र्यदिनानिमित्त, माझे वडील १९८७च्या बॅचचे आयपीएस गंगेश्वर सिंग यांना उत्कृष्ट सेवेबद्दल पश्चिम बंगाल सरकारने मुख्यमंत्री पदकाने सन्मानित करण्यात आले, हा निव्वळ योगायोग म्हणावा.
आम्ही योद्ध्याची भावना बाळगतो!
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना त्या म्हणाल्या, ‘प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक महिला असते. सैनिकाच्या पत्नीबद्दल ही म्हण अधिक योग्य वाटते. सैन्य अधिकारी एकावेळी फक्त एकच मोर्चा हाताळतो पण, त्याची पत्नी, दुर्गामातेप्रमाणे दहा हातांसमान एकावेळी अनेक मोर्चे सांभाळते. पतीची काळजी घेणे, मुलांचे संगोपन करणे, वृद्ध सासू-सासऱ्यांची सेवा करणे, नातेसंबंध जपणे, काहीही निश्चित नसलेल्या ठिकाणी आशेचा दिवा तेवत ठेवणे, प्रत्येक दुःख सहन करून हसणे आणि आम्ही सैनिकांच्या पत्नी कोणता गणवेश घालू शकत नाही पण आम्ही योद्ध्याची भावना बाळगतो.’, असे मंजू सिंह-अर्स यांनी यावेळी म्हणाल्या.
(हेही वाचा “…तर याहून वेदनादायी दुसरं काहीच असू शकत नाही”; Veer Savarkar पुरस्कार सोहळ्यात विवेक फणसळकरांनी मांडली परखड भूमिका )
देशभक्ती दाखवण्यासाठी युद्धाची वाट पाहू नये!
त्या म्हणाल्या, ‘आपण आपल्या देशाच्या शूर सैनिकांना सलाम करतो. परंतु, देशभक्ती ही केवळ त्यांची जबाबदारी नाही, खरी देशभक्ती आपल्या आतून सुरू होते. जेव्हा आपण प्रामाणिकपणे कर भरतो, संविधानाचा आदर करतो आणि एकतेने राहतो. आपण आपल्या सैन्याला पाठिंबा देतो. आपली देशभक्ती दाखवण्यासाठी आपण युद्धाची वाट पाहू नये. आपले सैनिक सीमांचे रक्षण करतात. आपण आपल्या मूल्यांचे, आपल्या स्वातंत्र्याचे, आपल्या एकतेचे रक्षण केले पाहिजे’, असे नमूद करताना त्या म्हणाल्या की, मजबूत भारताचे स्वप्न केवळ त्यांचे नाही. हे स्वप्न आपल्या सर्वांचे आहे आणि ते पूर्ण करणे ही आपली देखील जबाबदारी आहे. तरच आपण अभिमानाने म्हणू शकू ‘एक भारत श्रेष्ठ भारत’, असे मंजू सिंह-अर्स यांनी पुरस्कार सोहळ्यात उपस्थितांना संबोधित करताना म्हटले.(Veer Savarkar 2025)
Join Our WhatsApp Community