Vasaicha Raja : ‘वसईचा राजा’ गणेशोस्तव मंडळाचा वसई-विरार महानगरपालिकेकडून गौरव

90
मंगळवार, 15 ऑगस्ट 2023 रोजी ७७व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने वसई विरार शहर महानगरपालिकातर्फे ‘वसईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा’चा सत्कार करण्यात आला. मंडळाने सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल आयोजित शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात हा सन्मान देण्यात आला.
वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त अनिल कुमार, आमदार क्षितीज ठाकूर, प्रथम महापौर राजीव पाटील यांच्या हस्ते मंडळाला सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. हा सन्मान मंडळाचे अध्यक्ष निलेश भानुशे, योगेश भानुशे, राहुल भंडारकर, राहुल पाटील, वीरेंद्र यादव आणि जिग्नेश जगताप यांनी स्वीकारला. मंडळाने गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. अशा पद्धतीचे जिल्ह्यातील एकमेव मंडळ आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवा संचालनालयाने महाराष्ट्र दिनी १ मे रोजी मंडळाला पुरस्कार देऊन गौरवले होते. त्यामुळे १५ ऑगस्ट रोजी वसई विरार महापालिकेनेही मंडळाचा सत्कार केला, असे मंडळाचे पदाधिकारी राहुल भंडारकर म्हणाले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.