पुण्यातील (Pune) वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची चर्चा राज्यभर सुरु आहे. वैष्णवीने हुंड्यासाठी सासरचे करत असलेल्या मागण्यांना कंटाळून आत्महत्या केली आहे. वैष्णवीच्या वडिलांनी तिच्या लग्नात एक फॉर्च्यूनर गाडी आणि ५१ तोळे सोने दिल्याचीही चर्चा सुरु आहे. या फॉर्च्यूनर गाडीची (Fortuner car) सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. (Vaishnavi Hagawane Case) अशातच आता सोलापुरातील एका सामाजिक कार्यकर्त्याने त्याच्या कारवर लिहिलेला मजकूर सध्या चर्चेत आला आहे. सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील करमाळ्यातील शेतकरी संघटनेचे नेते अतुल खुपसे यांनी स्वतःच्या फॉर्च्यूनर गाडीच्या मागील काचेवर फॉर्च्यूनरचे मनोगतच लिहिले आहे. सध्या या मजकुराचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
फॉर्च्यूनरवरील मजकूर काय आहे?
“तशी तर मी मोठ्या घरची राणी, मात्र बदनाम केलं मला हगवणे यांनी. मी फॉर्च्यूनर. माझा रुबाबच वेगळा, हगवणे कुटुंबामुळे नाव ठेवू लागलाय गाव सगळा. अतुल भाऊंनी मला रोखीत विकत घेतलंय, पण हगवणेंमुळे फॉर्च्यूनर जातीला लोकांनी धू धू धुतलंय”, असा मजकूर अतुल खुपसे यांनी कारच्या मागच्या काचेवर लिहिला आहे.
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण काय आहे ?
पुण्यातील राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे यांनी राहत्या घरी आत्महत्या केली. वैष्णवीच्या वडिलांनी ही आत्महत्या हुंड्यासाठी असल्याचा आरोप केला. तसेच वैष्णवीच्या शरीरावर मारहाणीच्या खूणाही सापडल्याचे सांगण्यात येत आहे. हगवणे यांनी दोन कोटींची मागणी केली होती, या पैशासाठीच वैष्णवीचा छळ केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. (Vaishnavi Hagawane Case)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community