वाढवण बंदर प्रकल्पामुळे मिळणार रोजगारांच्या संधी; Nitesh Rane यांचा मोठा निर्णय

तरुणांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण लवकरच

70
वाढवण बंदर प्रकल्पामुळे मिळणार रोजगारांच्या संधी; Nitesh Rane यांचा मोठा निर्णय
  • प्रतिनिधी

राज्यातल्या किनारपट्टीला औद्योगिक व रोजगाराच्या दृष्टीने नवी दिशा देणारा वाढवण बंदर प्रकल्प आता प्रत्यक्षात आकार घेऊ लागला आहे. याच पार्श्वभूमीवर, या भव्य प्रकल्पामुळे निर्माण होणाऱ्या हजारो रोजगारांच्या संधींचा थेट लाभ राज्यातील तरुणांना व्हावा, यासाठी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्यात कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

मंगळवारी मंत्रालयात आयोजित ‘वाढवण बंदरातील रोजगार व प्रशिक्षण संधी’ या विषयावरील बैठकीत राणे (Nitesh Rane) बोलत होते. राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचे (NSDC) सल्लागार डॉ. ज्ञानेश्वर मुळे देखील दुरदृष्य प्रणालीद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते. “प्रकल्प सुरू होण्याआधीच कुशल मनुष्यबळ तयार होणे आवश्यक असून, त्यासाठी विशेष कौशल्य विकास कार्यक्रम तात्काळ आखावा,” असे स्पष्ट करत राणे म्हणाले, “पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये शिबिरे घेऊन नागरिकांना या संधींबाबत जागरूक करावे.”

(हेही वाचा – कोल्हापुरात राजकीय भूकंप! Rajesh Kshirsagar यांनी काँग्रेसला जोरदार धक्का देत केला ‘हा’ दावा)

शिबिरांमध्ये काय शिकवले जाणार?

या शिबिरांमध्ये वाढवण बंदर प्रकल्पामध्ये कोणत्या प्रकारचे रोजगार निर्माण होणार आहेत, त्यासाठी कोणत्या कौशल्यांची गरज भासते, आणि प्रशिक्षणाची रूपरेषा काय असेल – याची माहिती दिली जाणार आहे. NSDC ला प्रशिक्षण आराखडा तयार करण्याच्या सूचनाही दिल्या असून, राज्यातील विद्यमान कौशल्य विकास केंद्रांच्या इमारती या प्रशिक्षणासाठी वापरण्याचा प्रस्तावही पुढे ठेवण्यात आला आहे. त्यामुळे जागेची समस्या येणार नाही आणि कार्यक्रम तत्काळ सुरू होऊ शकतो.

मंत्री राणे (Nitesh Rane) म्हणाले, “वाढवण बंदरामुळे राज्यात रोजगाराच्या प्रचंड संधी निर्माण होणार आहेत. या संधींचा फायदा थेट आपल्या तरुणांना व्हावा, म्हणून हे प्रशिक्षण अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी बंदरे विभागाकडून सर्व प्रकारची मदत केली जाईल.” राज्यातील तरुणांसाठी रोजगाराच्या संधी खुले करणारा वाढवण प्रकल्प, आता एक ‘स्किल मिशन’ घेऊन पुढे येत आहे. नोकरीसाठी वणवण फिरणाऱ्या तरुणांना योग्य मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष रोजगार मिळवून देण्यासाठी सरकार सज्ज झाले आहे. राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी ही संधी सुवर्णक्षण ठरू शकते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.