Vadgaon-Sheri Accident: वडगाव-शेरी चौकात उलटलेल्या टँकरची वायूगळती १८ तासांनी नियंत्रणात

96
Vadgaon-Sheri Accident: वडगाव-शेरी चौकात उलटलेल्या टँकरची वायूगळती १८ तासांनी नियंत्रणात
Vadgaon-Sheri Accident: वडगाव-शेरी चौकात उलटलेल्या टँकरची वायूगळती १८ तासांनी नियंत्रणात

वडगाव-शेरी चौकात रविवारी पलटी (Vadgaon-Sheri Accident) झालेल्या टँकरमधून मोठ्या प्रमाणात झालेल्या वायूगळतीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. अग्निशमन दल, पोलीस आणि प्रशासन यांना याकामी १८ तास मेहनत घ्यावी लागली. यामुळे पुण्यात मोठा धोका टळला.

Photo courtesy Google 52

रविवारी रात्री अग्निशमन दल नियंत्रण कक्षात नगर रस्त्यावर वडगाव शेरी चौकालगत एक गॅस असलेला टँकर पलटी झाला असून मोठ्या प्रमाणात वायू गळती होत असल्याचा फोन आला होता. त्याचवेळी घटनेचे गांभीर्य ओळखून पुणे अग्निशमन दलाकडून मदत घटनास्थळी रवाना करण्यात आली. घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहिले की, अपघातग्रस्त टँकरमधून मोठ्या प्रमाणात वायूगळती होत आहे. या गळतीवर १८ तासांच्या प्रयत्नांनी यश आले. त्यामुळे वायूगळतीमुळे होणारी दुर्घटना टळल्यामुळे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी कालची रात्र वैऱ्याची होती, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

(हेही वाचा – Pro. Anil Nene: अर्थशास्त्राचे प्राध्यापक आणि सावरकर अभ्यासक अनिल नेने यांचे बँकॉक येथे निधन)

काय केले खबरदारीचे उपाय?
–  गळती झालेला वायू इथिलिन ऑक्साइड असून ज्वलनशील आणि धोकादायक असून पाण्यात विरघळणारा असल्याचे समजले. त्यानंतर यावर सेकंदाचाही विलंब न करता पाण्याचा फवारा केला. सातत्याने चारही बाजूने सतत पाणी फवारणी करण्याचे कार्य अग्निशमन दलाचे जवान करत होते.

– खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक इतर मार्गांवर वळवण्यात आली.

– रहदारीच्या ठिकाणी टँकर पलटी झाला होता. त्यामुळे पुणे-अहमदनगर रोडवरील वडगाव शेरी चौकात दिवसरात्र रहदारी असते. येथे मोठ्या प्रमाणात लोकांचे वास्तव्य आहे. त्यामुळे प्रशसनाच्या विविध पथकांनी घटनास्थळी जाऊन नियंत्रण मिळवले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.