Uttarakhand Tunnel Collapse : बोगद्यात अडकलेल्या कामगारांच्या बचावासाठी आता नवा प्रयत्न; ‘असे’ होणार बोगद्याचे ड्रिलिंग

68
Uttarakhand Tunnel Collapse : बोगद्यात अडकलेल्या कामगारांच्या बचावासाठी आता नवा प्रयत्न; 'असे' होणार बोगद्याचे ड्रिलिंग
Uttarakhand Tunnel Collapse : बोगद्यात अडकलेल्या कामगारांच्या बचावासाठी आता नवा प्रयत्न; 'असे' होणार बोगद्याचे ड्रिलिंग

मागील दोन आठवड्यांपासून उत्तराखंडमधील बोगद्यात 41 कामगार अडकले आहेत. (Uttarakhand Tunnel Collapse) या कामगारांना वाचवण्यासाठी सरकार शर्थीचे प्रयत्न करत आहे. कामगारांना बाहेर काढण्यासाठी विविध यंत्रणांकडून आतापर्यंत अनेक पर्याय वापरून झाले आहेत. बोगद्याचे ड्रिलिंग (Tunnel Drilling) करतांना ऑगर मशीनचा (Auger Machine) काही भाग अडकल्याने बचावकार्य मंदावले आहे.

(हेही वाचा – Jalyukta Shiwar : जलयुक्त शिवार लोकचळवळ बनवून मिशन मोडवर राबवणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे)

१२ नोव्हेंबरला दुर्घटना घडल्यापासून कामगारांना वाचवण्यासाठी ड्रिलिंगचे काम सुरू होते. ड्रिलिंगसाठी अमेरिकन ऑगर मशीन वापरली जात होती. 24 नोव्हेंबर, शुक्रवारी रात्री ऑगर मशीनचे ब्लेड ढिगाऱ्यात अडकले. हे भाग काढण्यासाठी एक प्लाझ्मा मशीन (Plasma Machine) हैदराबादहून एअरलिफ्ट करण्यात आली आहे. यात वेळ लागू शकतो, त्यामुळे आता व्हर्टिकल ड्रिलिंगचा (Vertical Drilling) पर्याय वापरला जात आहे.

26 नोव्हेंबर, रविवार रोजी बोगद्यात व्हर्टिकल ड्रिलिंगचे काम सुरू झाले आहे. यात बोगद्याच्या वरून उभे खोदकाम केले जात आहे. अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, आतापर्यंत 15 मीटरचा एक भाग ड्रिल करण्यात आला आहे. कोणताही अडथळा न आल्यास या मार्गाने अडकलेल्या कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी 100 तास लागतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

(हेही वाचा – Mumbai Attack : २६/११ सारखे हल्ले होऊ न देण्याची जबाबदारी केवळ सुरक्षारक्षकांची नव्हे तर सामान्यजनांचीही – मंगलप्रभात लोढा )

नेमके काय घडले ? 

पहाटे साडेपाचच्या सुमारास ब्रह्मखाल यमुनोत्री महामार्गावरील (Yamunotri Highway) बांधकामाधीन बोगद्याच्या सिल्क्यरा टोकाजवळ ढिगारा पडल्याने आत काम करणारे ४१ मजूर अडकले. सकाळी नऊच्या सुमारास बचावकार्य सुरू झाले. बचाव मोहिमेचा एक भाग म्हणून बोगद्यात असलेला ५५ मीटर लांबीचा ढिगारा जड उत्खनन यंत्राच्या साह्याने बाहेर काढण्याचा पहिला प्रयत्न करण्यात आला, मात्र असे करताना आणखी ढिगारा खाली पडू लागला आणि त्यात यश आले नाही. (Uttarakhand Tunnel Collapse)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.