Melissa Hortman : अमेरिकेत महिला खासदाराच्या घरात घुसून गोळीबार

55

अमेरिकेतील (US) मिनेसोटामध्ये (Minnesota) असलेल्या ब्रुकलिन पार्क आणि चॅम्पलिनमध्ये शनिवारी दोन डेमोक्रेटिक संसद सदस्यांच्या घरावर गोळीबार करण्यात आला. ज्यात एकाची हत्या झाली आहे, तर दुसऱ्याची अवस्था गंभीर आहे. यात माजी हाऊस स्पीकर मेलिसा हॉर्टमॅन आणि त्यांच्या नवऱ्याचे निधन झाले. (Melissa Hortman) या प्रकरणात मिनेसोटाचे गव्हर्नर टिम वॉल्ज यांनी सांगितले की, राज्याच्या माजी हाऊस स्पीकर मेलिसा हॉर्टमॅन आणि त्यांची पतीची गोळी झाडून हत्या करण्यात आली. या हल्ल्यात सीनेटर जॉन हॉफमॅन आणि त्याची पत्नी येवेट यांना देखील दुखापत झाली आहे. टिम वॉल्ज यांनी या गोळीबाराला राजकीय हल्ला असल्याचे म्हटले आहे. अजून सत्य काय आहे, हे समोर आलेले नाही.

(हेही वाचा – Ahmedabad Plane Crash : गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या मृतदेहाची ओळख पटली ; 31 मृतदेहांचे डीएनए जुळले)

कोण होत्या मेलिसा हॉर्टमॅन?

मेलिसा हॉर्टमॅन मिनेसोटा (Minnesota) राज्याच्या हाउस स्पीकर होत्या आणि डेमोक्रेटिक पार्टीच्या (Democratic Party) वरिष्ठ नेत्या होत्या. त्या मिनेसोटाच्या राजकारणात प्रभावशाली असलेल्या लोकांपैकी एक होत्या. इतकंच नाही तर त्या उत्तर मिनियापोलिस क्षेत्राचं प्रतिनिधित्व करायच्या. त्या मिनेसोटा डेमोक्रेटिक-शेतकरी-श्रम पार्टीच्या सदस्य देखील होत्या.

हल्ल्यात सीनेटर जॉन हॉफमॅन यांना दुखापत

स्टेट सीनेटर जॉन हॉफमॅन (John Hoffman) आणि त्यांच्या पत्नीला देखील या हल्ल्यात गोळी लागली आहे. हॉफमॅन 2012 मध्ये सीनेटमध्ये होते आणि त्यांनी आधी मिनेसोटाच्या सगळ्यात मोठ्या स्कूल डिस्ट्रिक्ट एनोका-हेनपिनच्या स्कूल बोर्डमध्ये सेवा केली होती. त्यांची एक सल्लागार कंपनी असून त्याचं नाव हॉफमॅन स्ट्रेटिजिक एडवायजर्स आहे. हॉफमॅन आणि त्यांच्या पत्नीला दोन मुली आहेत. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, हॉफमॅन आणि त्यांच्या पत्नीची सर्जरी ही यशस्वी झाली आणि ते सध्या धोक्यातून बाहेर आहेत.

पोलिसांना एका व्यक्तीवर संशय असून त्याचा शोध घेतला जो पोलिसांच्या वर्दीत होता. सार्वजनिक सुरक्षा आयुक्त बॉब जॉनसन यांनी सांगितलं की, ‘ही व्यक्ती कायदा आणि सुव्यवस्थेचा बनावट चेहरा बनून लोकांच्या विश्वासासोबत खेळते. आमच्या सेवेचे आणि संरक्षणाचे प्रतीक असलेल्या वर्दीचा गैरवापर करणे खूप चिंताजनक आहे.’

राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प याविषयी बोलताना म्हणाले, ‘मिनेसोटात झालेल्या या भयानक गोळीबाराची माहिती मला मिळाली आहे, स्पष्टपणे राज्याच्या नेत्यांवर निशाणा साधण्यात आला आहे. अमेरिकेत असा हिंसाचार सहन केला जाणार नाही.’ त्याशिवाय त्यांनी एफबीआयला चौकशीचे आदेश दिले आहेत. (Melissa Hortman)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.