UPSC 2025 चा निकाल जाहीर: शक्ती दुबे देशात पहिला, तर पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा

68

UPSC 2025 : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षा 2024 चा अंतिम निकाल (UPSC Civil Services Result 2024) जाहीर केला आहे. उमेदवार युपीएससीची अधिकृत बेवसाईट upsc.gov.in वर जाऊन आपला निकाल पाहू शकतात. उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथील शक्ती दुबे या उमेदवाराने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. तर, हर्षिता गोयल देशात दुसरी आली असून अर्चित डोंगरेने देशात तिसरा क्रमांक पटकावत बाजी मारली आहे. विशेष म्हणजे हा मराठी असून महाराष्ट्रात पहिला आला आहे. अर्चित हा पुण्यातला (Pune) रहिवाशी असून देशात तिसरा क्रमांक मिळवत त्याने महाराष्ट्राची व पुण्याची मान उंचावली आहे.  (UPSC 2025)

(हेही वाचा – Dr. Ghaisas Case : आयएमए, हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा)

युपीएससी आयोगाकडून (UPSC Commission) 2024 च्या युपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून upsc.gov.in या वेबसाईटवर उमेदवारांना हा निकाल पाहता येणार आहे. यंदाच्या परीक्षेत शक्ती दुबे या उमेदवाराने देशात प्रथम क्रमांक पटकावला असून एकूण 1009 उत्तीर्ण उमेदवारांची यादी प्रकाशित करण्यात आली आहे. त्यामध्ये, 335 सर्वसाधारण, 109 ईडब्लूएस, 318 ओबीसी, 160 एससी, 87 एसटी प्रवर्गातील उमेदवार आहेत. विशेष म्हणजे 17 एप्रिल 2025 पर्यंत या युपीएससी परीक्षांसाठी (UPSC Exam) उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. तर, 7 जानेवारी 2025 पासून मुलाखतीच्या राऊंडला सुरुवात झाली होती. युपीएसीकडून 2024 च्या परीक्षेसाठी आयएएस, आयपीएससह एकूण 1132 पदांसाठी भरती काढली होती.

(हेही वाचा – BMC : दोन सहाय्यक आयुक्तांची बदली; अभियंत्याच्या संघटनेने टोचले आयुक्तांचे कान)

दरम्यान, युपीएससी परीक्षेत यंदाही मराठमोळ्या उमेदवारांनी आघाडी घेतली असून पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा आला असून महाराष्ट्रात पहिला क्रमांक त्याने पटकावला आहे. ठाण्यातील तेजस्वी देशपांडे हिने 99 वा क्रमांक पटकावला असून ठाण्याच्याच अंकिता पाटीलने 303 वा क्रमांक मिळवला आहे. त्यामुळे, मुलींनी देखील यंदाच्या परीक्षेत आपली सरशी दाखवून दिली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.