
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची पीएच. डी. सामाईक प्रवेश परीक्षेचे (Exam) आयोजन रविवार, 01 जून रोजी करण्यात आले आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 करिता विद्यापीठ संलग्नित महाविद्यालय, संशोधन केंद्रामध्ये वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी व तत्सम विद्याशाखेंतर्गत पीएच. डी. अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी, पीएच. डी. सामाईक प्रवेश परीक्षा (Ph. D. Entrance Test 2024-25) नाशिक येथील एम. ई. टी. भुजबळ नॉलेज सिटी येथे सकाळी 10 ते 11.30 या सत्रात पेपर – 1 व 12 ते 01.30 या सत्रात विषयनिहाय पेपर ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आले आहे. सदर परीक्षेसाठी (Exam) 959 पेक्षा अधिक विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत.
(हेही वाचा – ई-बसेसच्या पुरवठ्यावर मंत्री Pratap Sarnaik यांचा जोर; कंपनीला नवीन वेळापत्रकानुसार बसेस देण्याचे निर्देश)
सदर परीक्षेसाठी (Exam) परीक्षार्थ्यांनी परीक्षाकेंद्रावर सकाळी 08 वा. रिपोर्ट करणे अनिवार्य आहे. परीक्षेच्या वेळी पडताळणीसाठी परीक्षार्थींनी मूळ वैध आधारकार्ड, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र किंवा ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पॅन कार्ड यापैकी एक ओळखपत्र हॉल तिकीटसह सोबत ठेवणे अनिवार्य आहे, अन्यथा परीक्षार्थ्यांना परीक्षेला (Exam) बसण्याची परवानगी दिली जाणार नाही असे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी स्पष्ट यांनी केले. पीएच. डी. सामाईक प्रवेश परीक्षा 2024-25 (Ph. D. Entrance Test 2024-25) महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत प्रथमतःच ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community