EPFO: PF धारकांना मोठा धक्का, पेन्शनवाढीचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला

85

कर्मचारी आणि नोकरदार वर्गासाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच EPFO सदस्यांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडून फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे करोडो कर्मचा-यांना याचा फटका बसणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

अर्थ मंत्रालयाने फेटाळला प्रस्ताव

EPFO अंतर्गत सदस्य असलेल्या पीएफ धारकांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याची मागणी ही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने करण्यात येत होती. त्यामुळेच पीएफ धारकांच्या सध्याच्या पेन्शनमध्ये दरमहा एक हजार रुपयांची वाढ करण्यात यावी, असा प्रस्ताव कामगार मंत्रालयाकडून अर्थ मंत्रालयाला देण्यात आला होता. पण हा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाने फेटाळला आहे. या संदर्भात संसदीय समिती अर्थ मंत्रालयाकडून स्पष्टीकरण मागणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

(हेही वाचाः EPFO: PF खातेधारकांना सरकारने दिली आनंदाची बातमी, खात्यात व्याज जमा व्हायला सुरुवात! असा चेक करा बॅलेन्स)

समितीने मागितले स्पष्टीकरण

कामगार मंत्रालय आणि ईपीएफओच्या वरिष्ठ अधिका-यांनी कामगार विषयक संसदीय स्थायी समितीला ईपीएफ पेन्शन योजनेच्या संचालनाविषयी आणि त्याच्या निधीच्या व्यवस्थापनाबाबत माहिती दिली. त्यावेळी मासिक पेन्शनमध्ये वाढ करण्याच्या कामगार मंत्रालयाच्या प्रस्तावाशी अर्थ मंत्रालय सहमत नसल्याचे यावेळी अधिका-यांकडून सांगण्यात आले. दरम्यान, याबाबत समितीने स्पष्टीकरण मागितले असून त्यासाठी अर्थ मंत्रालयाच्या उच्च अधिका-यांशी बैठक करणार असल्याचे सांगितले आहे.

(हेही वाचाः EPF Pension Scheme 2014: EPF पेन्शन योजनेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! कोट्यवधी कर्मचा-यांना होणार फायदा)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.