Unauthorized Debris : माटुंगा पश्चिममधील कटारिया जोड रस्त्यावर टाकले गेले अनधिकृत डेब्रीज

काही ठिकाणी रात्रीच्या वेळी राडारोडा वाहतूक करुन निर्जन ठिकाणी टाकून दिल्याचे आढळून येते.

103
Unauthorized Debris : माटुंगा पश्चिममधील कटारिया जोड रस्त्यावर टाकले गेले अनधिकृत डेब्रीज
Unauthorized Debris : माटुंगा पश्चिममधील कटारिया जोड रस्त्यावर टाकले गेले अनधिकृत डेब्रीज

मुंबईमध्ये धुळीचे हवेतील प्रदुषण नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना आखली जात असून अनेक ठिकाणी रस्त्यावर टाकल्या जाणाऱ्या अनधिकृत डेब्रीजच्या (Unauthorized Debris) समस्येवर महापालिकेने कडक पाऊल उचलूनही माटुंगा पश्चिम भागात अनेक ठिकाणी अशाप्रकारे अनधिकृत डेब्रीज (Unauthorized Debris) टाकले जात आहे. माटुंगा पश्चिम येथील टी. एच. कटारिया मार्गाला (TH Kataria Marg) जोडणाऱ्या जाणाऱ्या मोगल लेनवर कर्नाटक संघासमोरील जागेतच अनधिकृत बांधकामाचा राडारोडा (Unauthorized Debris) टाकल्या गेला आहे. मात्र, या राडारोडा टाकणाऱ्या विरोधात ना कारवाई ना महापालिकेच्यावतीने यावर कोणतीही कारवाई केली जात.

बांधकामातील राडारोडा तसेच टाकाऊ साहित्यांची वाहतूक काळजीपूर्वक केली जावी. बेजबाबदारपणे आणि इतरांना घातक ठरेल, अशाप्रकारे वाहतूक चालवणाऱ्यांवर विशेष पथकाच्या माध्यमातून कडक कारवाई केली जावी. तसेच दंडासोबत कायदेशीर कार्यवाही करावी असे निर्देश महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांना २० ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या बैठकीत दिल्यानंतरही मुंबईत बांधकामातील राडारोडा (Unauthorized Debris) अनधिकृतपणे रस्त्यावरच रिकामी केला जात आहे.

काही ठिकाणी रात्रीच्या वेळी राडारोडा वाहतूक करुन निर्जन ठिकाणी टाकून दिल्याचे आढळून येते. अशा प्रकारांना रोखण्यासाठी पथकांची स्थापना करावी, या पथकांनी रात्री गस्त करुन अशा वाहनांवर थेट कारवाई करावी, असेही निर्देश आयुक्तांनी दिले होते. परंतु आयुक्तांच्या निर्देशानंतरही माटुंगा पश्चिम येथील टी. एच. कटारिया मार्गाला जोडणाऱ्या मोगल लेनमधील कर्नाटक संघाच्या प्रवेशद्वाराजवळच तब्बल दोन ट्रक भरेल एवढा राडारोडा शुक्रवारच्या मध्यरात्री टाकण्यात आल्याचे बोलले जात आहे. (Unauthorized Debris)

(हेही वाचा – Zero Prescription Policy : महापालिकेच्या ‘त्या’ रुग्णालयांमध्ये सन २०१४ पासून झिरो प्रिस्क्रिप्शन)

स्थानिक दुकानदारांच्या म्हणण्यानुसार शनिवारी सकाळपासूनच या रस्त्यावर अशाप्रकारे डेब्रीज पडलेले पहायला मिळाले. यापूर्वीच याच ठिकाणी अशाप्रकारे डेब्रीज (Unauthorized Debris) टाकले होते. त्यामुळे या ठिकाणी सातत्याने अशाप्रकारचे डेब्रीज टाकले जात असून या भागासह आसपासच्या रस्त्यावर बऱ्याच वेळा अशाप्रकारचे डेब्रीज टाकले जात आहे. हा प्रकार आता नित्याचाच घडला असल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे. महापालिकेच्या जी उत्तर विभागाच्या वतीने अद्यापही अशाप्रकारे बांधकामाचा राडारोडा टाकणाऱ्याचा शोध घेऊन त्यांच्याविरोधात कारवाई केली जात नसल्याचीही दुकानदारांकडून केली जात आहे. (Unauthorized Debris)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.